Lokmat Money > बिझनेस न्यूज > (वाचली) क्रीडा धोरण समिती सदस्यपदी वीरधवल खाडे - कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला प्रथमच मिळाला असा मान

(वाचली) क्रीडा धोरण समिती सदस्यपदी वीरधवल खाडे - कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला प्रथमच मिळाला असा मान

कोल्हापूर : ऑलिंम्पिकवीर वीरधवल खाडे याचा उच्चस्तरीय क्रीडा धोरण समितीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील १९ क्रीडा प्रबोधिनीच्या कामांचे मूल्यमापन व क्रीडा धोरण ही समिती करणार आहे. याबाबतचे पत्र वीरधवलला नुकतेच मिळाले.

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:24+5:302014-08-22T22:11:24+5:30

कोल्हापूर : ऑलिंम्पिकवीर वीरधवल खाडे याचा उच्चस्तरीय क्रीडा धोरण समितीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील १९ क्रीडा प्रबोधिनीच्या कामांचे मूल्यमापन व क्रीडा धोरण ही समिती करणार आहे. याबाबतचे पत्र वीरधवलला नुकतेच मिळाले.

(Read) Veerdhaval Khade as sports committee committee member - First of all to get the sporting field of Kolhapur | (वाचली) क्रीडा धोरण समिती सदस्यपदी वीरधवल खाडे - कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला प्रथमच मिळाला असा मान

(वाचली) क्रीडा धोरण समिती सदस्यपदी वीरधवल खाडे - कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला प्रथमच मिळाला असा मान

ल्हापूर : ऑलिंम्पिकवीर वीरधवल खाडे याचा उच्चस्तरीय क्रीडा धोरण समितीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील १९ क्रीडा प्रबोधिनीच्या कामांचे मूल्यमापन व क्रीडा धोरण ही समिती करणार आहे. याबाबतचे पत्र वीरधवलला नुकतेच मिळाले.
जलतरणमधील यशाची शिखरे गाठणारा वीरधवल सध्या बोरिवली येथे तहसीलदार पदावर कार्यरत आहे. या समितीत वीरधवलसह आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू काका पवार, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत, प्राचार्य क्रीडा प्रबोधिनी नागपूर व पुणे यांचा या समितीत समावेश आहे. वीरधवलच्या समावेशामुळे प्रथमच हा मान कोल्हापूरच्या क्रीडाविश्वाला मिळत आहे. याचबरोबर २०१० मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा मान ज्येष्ठ मल्ल गणपतराव आंदळकर व टेबलटेनिसपटू शैलजा साळुंखे यांच्यानंतर मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ५७ सुवर्णपदक, १७ रौप्य व १३ कांस्यपदके प्राप्त केली आहेत. त्याच्या निवडीबद्दल संपूर्ण कोल्हापूरचा बहुमान असल्याच्या प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातून उमटत आहेत.
---
संग्रहीत फोटो वापरणे

Web Title: (Read) Veerdhaval Khade as sports committee committee member - First of all to get the sporting field of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.