कल्हापूर : कोणत्याही खेळात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनत केल्याशिवाय चांगले फळ मिळत नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट यांनी केले. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र हायस्कूल येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रीडा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे होते. शिरसाट म्हणाले, मेहनत केल्यानंतर कोणत्याही खेळात यश आपलेच असते. त्यामुळे कोणत्याही खेळात प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यानंतर राज्य किंवा राष्ट्रीय संघात निवडही होते. त्यामध्ये केवळ खेळाडूंची कामगिरी उच्च दर्जाची पाहिजे. कामगिरीची दखल निवड समितीला घ्यावीच लागते. त्यामुळे खेळात शॉर्टकट मारू नका, असा सल्ला शिरसाट यांनी उपस्थितांना दिला. याप्रसंगी अक्षय मुळीक, कौशल महाडिक (शूटिंग), युगंधरा शिर्के (जलतरण), श्रावणी जंगटे, किर्तीकुमार बनके व उज्ज्वला पाटील (मैदानी), अक्षय कदम (बेसबॉल), विश्वजित पाटील, ऐश्वर्या पाटील (तायक्वांदो), प्रणित कोळी (मल्लखांब), शंकर चौगले (वुशू), शशीन कोकतकर (शूटिंग), समेद शेटे (बुद्धिबळ), ऐश्वर्या चव्हाण, श्वेता पाटील, रमा पोतनीस, अनिश जाधव (हॉकी) या खेळाडूंचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिरसाट यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी शिवछत्रपती विजेते बिभीषण पाटील, नगरसेवक दिलीप भुर्के, जगमोहन भुर्के, क्रीडा अधिकारी सुभाष पोवार, उदय पवार, तालुका क्रीडा अधिकारी बी. बी. क्षीरसागर, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, प्रदीप पवार, सचिन शेलार, नजीर मुल्ला, मोहन भांडवले आदी उपस्थित होते.
(वाचली) खेळात कठोर मेहनतीशिवाय फळ नाही : शिरसाट
कोल्हापूर : कोणत्याही खेळात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनत केल्याशिवाय चांगले फळ मिळत नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट यांनी केले. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र हायस्कूल येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रीडा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे होते.
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:29+5:302014-08-31T22:51:29+5:30