Lokmat Money > बिझनेस न्यूज > (वाचली) महाराष्ट्र हायस्कूल फुटबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

(वाचली) महाराष्ट्र हायस्कूल फुटबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : दिल्ली येथे होणार्‍या ५५ व्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेसाठी चौदा वर्षांखालील गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाची निवड करण्यात आली आहे.

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:39+5:302014-09-12T22:38:39+5:30

कोल्हापूर : दिल्ली येथे होणार्‍या ५५ व्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेसाठी चौदा वर्षांखालील गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाची निवड करण्यात आली आहे.

(Read) Maharashtra High School Football Team's National Championship | (वाचली) महाराष्ट्र हायस्कूल फुटबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

(वाचली) महाराष्ट्र हायस्कूल फुटबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ल्हापूर : दिल्ली येथे होणार्‍या ५५ व्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेसाठी चौदा वर्षांखालील गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र हायस्कूल संघाने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून अनुक्रमे औरंगाबाद विभागाचा ७-०, तर उपांत्य सामन्यात नागपूर विभागाचा ६-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात नाशिक विभागाचा ५-० अशा गोलफरकाने पराभव करत प्रथम क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय कामगिरीवर दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हायस्कूलचा संघ पात्र ठरला.
संघातील खेळाडू असे, अनिकेत वरेकर, अक्षय मोळे, सिद्धेश साळोखे, ओंकार लायकर, हर्षवर्धन मोरे, दिग्विजय सुतार, महमदजैद बागवान, ऋतुराज आतकिरे, विशाल पाटील, कुणाल चव्हाण, संकेत जरग, हृषीकेश पाटील, सूरज साळोखे, सतेज साळोखे, दिग्विजय आसणेकर .
विजयी संघास प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार, व्ही. एम. पाटील, प्राचार्य व्ही. बी. लोहार, यु. आर. आतकिरे, ए. के. देसाई, क्रीडा विभागप्रमुख एस. एस. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: (Read) Maharashtra High School Football Team's National Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.