ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्षातील तिसरे पतधोरण मंगळवारी जाहीर केले असून यात रेपो रेट, रिव्हर्स रेपो व कॅश रिझर्व्ह रेशिओ जैसे थे ठेवण्यात आले आहे. यामुळे व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्या उद्योग जगताच्या पदरी निराशाच पडली आहे.
आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी व्याजदरात कपात व्हावी अशी केंद्र सरकारची भूमिका होती. उद्योग व केंद्र सरकारकडून यासाठी दडपण येत असतानाच मंगळवारी रघुराम राजन यांनी आर्थिक पतधोरण जाहीर केले.राजन यांनी केंद्र सरकारच्या दबावापुढे नमते न घेता रेपो रेट कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले. रेपो रेट ७.२५ टक्क्यांवर तर सीआरआर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे.