रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून रेपो रेटमध्ये बदल न करता तो ७.५० टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे व्याज दरही कायम असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
By admin | Updated: April 7, 2015 11:50 IST2015-04-07T11:47:25+5:302015-04-07T11:50:40+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून रेपो रेटमध्ये बदल न करता तो ७.५० टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे व्याज दरही कायम असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदरात बदल नाही
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून रेपो रेटमध्ये बदल न करता तो ७.५० टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे व्याज दरातही कोणताही बदल झालेला नसून गृह किंवा वाहन कर्जाच्या हफ्त्यात बदल होणार नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण जाहीर करताना बँका यापुढे कसे आर्थिक धोरण अवलंबितात त्यावर पुढील दरकपात अवलंबून असेल असे सांगितले.
दरम्यान रिव्हर्स रेपो रेटही ६.५० टक्क्यांवर कायम असून एसएलआरमध्येही (२१.५०) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Web Title: RBI's policy announcement, interest rates do not change