मुंबई : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचे मॉड्यूल प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्णय उद्योगपती रतन टाटा, नंदन नीलकेणी आणि विजय केळकर यांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते अवंती फायनान्स ही कंंपनी स्थापन करत आहेत. आरबीआयकडे यासाठी त्यांनी अर्जही केला आहे. प्रामुख्याने गरीब वर्गाला कर्जपुरवठा करण्यासाठी हे पाउल उचलण्यात येत आहे.
अवंती मायक्रो फायनान्सची सुरुवात ३ डिसेंबरपूर्वी करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात
बोलताना टाटा आणि नीलकेणी
यांनी सांगितले की, परोपकाराच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. टाटा, नीलकेणी आणि केळकर यांच्यासह टाटा ट्रस्टचे व्यंकटरामन हे या उपक्रमाचा एक प्रमुख भाग असतील. कमी उत्पन्न असणाऱ्यांना अवंती फायनान्सच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशात २०१० मध्ये अनेक कर्जधारकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. हे सर्व लघू व मध्यम कर्जदार होते. अशा घटना टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. (प्रतिनिधी)
रतन टाटा, नीलकेणी आले एकत्र
नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचे मॉड्यूल प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्णय उद्योगपती रतन टाटा, नंदन नीलकेणी आणि विजय केळकर यांनी घेतला आहे
By admin | Updated: August 31, 2016 04:29 IST2016-08-31T04:29:44+5:302016-08-31T04:29:44+5:30
नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचे मॉड्यूल प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्णय उद्योगपती रतन टाटा, नंदन नीलकेणी आणि विजय केळकर यांनी घेतला आहे
