मुंबई : बँकिंग आणि वाहन उद्योग क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजार सलग चौथ्या दिवशीही तेजीत राहिला. भारतीय रिझर्व्ह बँक उद्या, मंगळवारी पतधोरणाचा फेरआढावा घेताना दिलासा देण्याच्या आशा बळावल्या असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) याच आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करणार असल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील मजबुती आणि कच्च्या तेलाचे भाव उतरल्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. सोमवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक सलग चौथ्या दिवशी चढती कमान राखत ७२.५० अंकांनी वधारत २८,१८७.०६ वर पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा (निफ्टी) निर्देशांकही दिवसअखेर १०.२० अंकांनी वर सरकत ८,५४३.१० वर स्थिरावला.
आशियाई बाजारातील नकारात्मक वातावरणाने खेळ बिघडतो की काय, असे वाटत होते. तथापि, सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवली मदत देण्याचा निर्णय घेतल्याने बँकिंग शेअर्सवर उड्या पडल्याने आशियातील वातावरणाचा परिणाम झाला नाही.
सलग चौथ्या दिवशी तेजी
बँकिंग आणि वाहन उद्योग क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजार सलग चौथ्या दिवशीही तेजीत राहिला. भारतीय रिझर्व्ह बँक
By admin | Updated: August 3, 2015 23:02 IST2015-08-03T23:02:46+5:302015-08-03T23:02:46+5:30
बँकिंग आणि वाहन उद्योग क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजार सलग चौथ्या दिवशीही तेजीत राहिला. भारतीय रिझर्व्ह बँक
