संगमनेरला पावसाचा तडाखा; नगरमध्ये पहिल्यांदाच बरसला - वाहनांचे नुकसान; अनेक कुटुंब बेघर
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST2014-08-26T21:56:24+5:302014-08-26T21:56:24+5:30

संगमनेरला पावसाचा तडाखा; नगरमध्ये पहिल्यांदाच बरसला - वाहनांचे नुकसान; अनेक कुटुंब बेघर
>संगमनेर(जि. अहमदनगर) : संगमनेर शहर व परिसराला मंगळवारी रात्री सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शहरात एकूण १४६ मिमी पावसाची नोंद झाली. नगर जिल्ह्यातील बहुसंख्य भागात अडीच महिन्यात पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे संगमनेरमधील अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी घुसले. नाटकी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात पुनर्वसन कॉलनी पूर्ण बुडाली. अनेक वाहने वाहून गेली. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले होते. झोपड्यांसह घरेच्या घरे पाण्याखाली बुडाली. गोरगरिबांची अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मुला-बाळांसह त्यांचा संसार उघड्यावर आला. नवीन नगर रोडवरील तळमजल्यातील दुकाने पाण्याखाली गेली. ३०० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ गेल्या अडीच महिन्यांपासून नगर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली होती़ सोमवारी रात्री उशिरा संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, नेवासे, नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेड परिसरात पाऊस पडला़ नगर तालुक्यात गेल्या अडीच वर्षांपासून पाऊस नव्हता़ सोमवारच्या पावसाने परिसरातील शेतकर्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली़ (प्रतिनिधी)---------------------------------फोटो: २६नगर-रेन नावाने एफटीपी केला आहे. ----------------------------