इंदौर : रेल्वेतून प्रवास करत असताना ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींची माहिती रेल्वेपर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वेने नवी सेवा सुरू केली असून, त्यामुळे आता आपली तक्रार थेट आॅनलाइन करणे शक्य होणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वेने वेबपोर्टल तयार केले आहे. या पोर्टलद्वारे प्रवाशांच्या तक्रारी तातडीने सोडविण्याचा प्रयत्न रेल्वे करणार आहे.
स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरून करता येणाऱ्या तक्रारी आणि सूचनांसाठी बेवपोर्टलवर प्रवाशांसाठी एक पर्याय देण्यात आला आहे. त्यात प्रवाशाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी काय हालचाली झाल्या, हेही समजू शकणार आहे.
रेल्वे प्रवाशांना अधिक कार्यक्षमपणे सेवा देण्यासाठी या वेबपोर्टलचा उपयोग होइल, याशिवाय वेबपोर्टलवर प्रवाशांनी दिलेल्या चांगल्या सूचना रेल्वेच्या नियमात बसल्या तर त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे. रेल्वे संदर्भातील तक्रारी किंवा सूचना http://www.coms. या वेबसाइटवर जाऊन कम्प्लेन्ट अॅण्ड सजेशन्स या पर्यायावर क्लिक करून नोंदवता येतील. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जो प्रवासी वेबपोर्टलवर तक्रार करेल, त्याला एक युनिक कम्प्लेन्ट आयडी दिला जाईल. या आयडीनुसार तक्रारदार त्याने दाखल केलेल्या तक्रारीचे नेमके काय झाले, हे पाहू शकेल. प्रवाशाने वेबपोर्टलवर एखाद्या स्टेशनसंदर्भात तक्रार नोंदविल्यास ती संबंधित रेल्वे स्टेशनवर किंवा विभागात निवारणासाठी जाईल. (वृत्तसंस्था)
ही माहिती द्यावी लागेल
वेबपोर्टलवरून तक्रार नोंदविताना प्रवाशाला त्याचा पीएनआर नंबर, स्टेशनचे नाव, ट्रेनचा नंबर अशी माहिती नमूद करावी लागेल. ही माहिती भविष्यातील वापरासाठी सेव्ह केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ट्विटरचाही वापर सुरू केला आहे. गेल्या वर्षी दोन हजारपेक्षा जास्त तक्रारी ट्विटरवरून त्यांच्याकडे आल्या होत्या.
प्रवाशांच्या तक्रारीसाठी रेल्वेचे वेबपोर्टल
रेल्वेतून प्रवास करत असताना ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींची माहिती रेल्वेपर्यंत
By admin | Updated: July 8, 2017 00:54 IST2017-07-08T00:54:37+5:302017-07-08T00:54:37+5:30
रेल्वेतून प्रवास करत असताना ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींची माहिती रेल्वेपर्यंत
