Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रेडिट कार्डधारकांना हप्त्यांवर रेल्वे आरक्षण

क्रेडिट कार्डधारकांना हप्त्यांवर रेल्वे आरक्षण

रेल्वे प्रवाशांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत. पहिली क्रेडिट कार्डधारकांसाठी असून, आॅनलाईन रेल्वे आरक्षण तिकीट बुक

By admin | Updated: December 26, 2014 23:27 IST2014-12-26T23:27:04+5:302014-12-26T23:27:04+5:30

रेल्वे प्रवाशांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत. पहिली क्रेडिट कार्डधारकांसाठी असून, आॅनलाईन रेल्वे आरक्षण तिकीट बुक

Railway Reservations on Credit Card Holders Installments | क्रेडिट कार्डधारकांना हप्त्यांवर रेल्वे आरक्षण

क्रेडिट कार्डधारकांना हप्त्यांवर रेल्वे आरक्षण

अकोला : रेल्वे प्रवाशांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत. पहिली क्रेडिट कार्डधारकांसाठी असून, आॅनलाईन रेल्वे आरक्षण तिकीट बुक करणाऱ्या क्रेडिट कार्डधारकांना आता सुलभ हप्त्यांवर (ईएमआय) रेल्वे आरक्षण तिकीट बुक करता येणार आहे. दुसरी बातमी विद्यार्थ्यांसाठी असून, रेल्वे प्रशासनाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या टूर पॅकेज विशेष गाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना ६० टक्के तिकिटात सवलत देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने अधिकृत संकेतस्थळावर जारी केली
आहे.
नवीन वर्षाला प्रारंभ होण्यापूर्वीच रेल्वे प्रवाशांना सुखावतील असे निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतले आहेत. सहा महिन्यांअगोदरच रेल्वे प्रशासनाने प्रवास भाड्यात १४.२ टक्के भाडेवाढ केली. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत अधिक पैसा मोजावा लागतोय. प्रवाशांना सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या रेल्वे प्रशासनाने आयआरसीटीसी या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून आॅनलाईन रेल्वे आरक्षण तिकीट बुक करणाऱ्या क्रेडिट कार्डधारकांना सुलभ हप्त्यांनी रेल्वे आरक्षण तिकीट वितरीत करण्याचे विचाराधीन असल्याचे नमूद केले आहे. काही विशिष्ट बँकांच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळत होता.
या सुविधेचा सरसकट सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या क्रेडिट कार्डधारकांना लाभ मिळावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.
लाभ घेणाऱ्या के्रडिट कार्डधारकाच्या थेट खात्यातूनच पैसे वजा होत असल्याने रेल्वे आणि सुविधा देणाऱ्या बँकांना कुठल्याही प्रकारचे नुकसान वा फसवेगिरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाही.
ईएमआय सुविधेचे स्वरूप
संकेतस्थळावर तिकीट बुक करताना ईएमआय हा विकल्प क्रेडिट कार्डधारकास निवडावा लागेल.
या माध्यमातून तिकिटाचे पूर्ण पैसे रेल्वेच्या खात्यात जमा होतील. मात्र, क्रेडिट कार्डधारकास तिकिटाचे पूर्ण पैसे सुलभ हप्त्यात बँकेस प्रदान करावे लागतील.

Web Title: Railway Reservations on Credit Card Holders Installments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.