सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा आता स्वस्तात वातानुकूलित (एसी) प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असून, प्रवाशांना नवीन श्रेणीतहत इकॉनॉमी एसी डब्यातून वातानुकूलित प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. प्रवास भाडेही नेहमीच्या तृतीय श्रेणीपेक्षा कमी असेल.
नवीन इकॉनॉमी एसी श्रेणीच्या डब्यातील थंडावा अन्य एसी ट्रेनच्या तुलनेत कमी असेल. इकॉनॉमी एसी श्रेणीतील डब्यातील तापमान २४ ते २५ डिग्री सेल्शिअस एवढे असेल. बाह्य उष्म्यापासून बचाव करून प्रवाशांचा प्रवास आरामदायी करणे, हाच या प्रस्तावित योजनेचा उद्देश आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आॅटोमॅटिक दरवाजे असतील...
या प्रस्तावित पूर्णत: वातानुकूलित ट्रेनचे वैशिष्ट्य असे की यात स्वयंचलित (आॅटोमॅटिक) दरवाजे असतील. काही निवडक मार्गावरील प्रवास अधिक आरामदायी करण्याच्या इराद्यातहत भारतीय रेल्वे या योजनेवर भर देत आहे.
सोयी-सुविधा अधिक अद्ययावत करण्यासह प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा तसेच सध्या ट्रेन आणि स्टेशनवर असलेल्या सोयी-सुविधांमध्ये बदल करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी
रेल्वेने एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
राजधानी, शताब्दी एक्स्प्रेसचा आंतरबाह्य कायापालट करण्यासोबत आता जास्तीत जास्त प्रवाशांना स्वस्तात वातानुकूलित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे.
सध्या मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये शयनयान कक्षासह फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी श्रेणीचे वातानुकूलित डबे असतात. तसेच राजधानी, शताब्दी आणि हमसफर यासारख्या ट्रेन पूर्णत: वातानुकूलित असतात."
भारतीय रेल्वे राजधानी, शताब्दी एक्स्प्रेसचा आंतरबाह्य कायापालट करण्याच्या तयारीला लागली आहे.
थेट प्रवाशांपर्यंत आवडीचे खाद्य-पेय उपलब्ध करून देण्यासाठी ट्रॉली सेवा, प्रवाशांच्या दिमतीला गणवेशधारी विनम्रभावे सेवा पुरविणारे कर्मचारीही असतील.
रेल्वेचा एसी प्रवास स्वस्तात होणार!
भारतीय रेल्वेचा आता स्वस्तात वातानुकूलित (एसी) प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असून, प्रवाशांना नवीन श्रेणीतहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 05:10 IST2017-07-03T05:10:45+5:302017-07-03T05:10:45+5:30
भारतीय रेल्वेचा आता स्वस्तात वातानुकूलित (एसी) प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असून, प्रवाशांना नवीन श्रेणीतहत
