कारंजा लाड (जि. वाशिम): भूगर्भासह जलाशयांमध्येही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरणीवर त्याचा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अमरावती विभागात रब्बीच्या पेऱ्यात घट झाली आहे. गतवर्षी विभागात ६ लाख ३५ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. यावेळी केवळ ५ लाख ७१ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली.
मागील तीन वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे. पेरणी करून आणखी संकटात भर नको, अशी भूमिकाच अमरावती विभागातील शेतकऱ्यांनी, प्रामुख्याने अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसत आहे. गतवर्षी अमरावती विभागात ५ लाख ९२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित असताना तब्बल ६ लाख ३५ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. हे प्रमाण १०७ टक्के होते. बुलडाणा जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित असताना, त्यामध्ये तब्बल ५० हजार हेक्टरची वाढ झाली, तसेच यवतमाळ जिल्ह्यात ८७ हजार हेक्टवर पेरणी अपेक्षित असताना त्यामध्ये १२ हजार हेक्टरची वाढ झाली. अमरावती जिल्ह्यात १ लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित असताना १ लाख ७४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. अकोला आणि वाशिम जिल्ह्यात त्यावेळीही पेरणी क्षेत्र घटले होते. अकोला जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्रात जवळपास ४० हजार हेक्टरची, तर वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्रात १२ हजार हेक्टरपेक्षा जास्त घट आली होती. यंदा अर्थात २०१५-१६ च्या रब्बी हंगामात १४ जानेवारी रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, अमरावती विभागातील प्रस्तावित रब्बी पेरणी क्षेत्र २१ हजार हेक्टरने घटले असले तरी यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; परंतु अमरावती, अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यांत मात्र अवर्षणामुळे रब्बीचा पेरा घटला आहे.
यंदा अकोला व वाशिम जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ३०० हेक्टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित असताना यामधील सहा हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख १५ हजार ७०० हेक्टरवर पेरणी अपेक्षित असताना के वळ ७१ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली, तर वाशिम जिल्ह्यात ८९ हजार ४०० हेक्टरवर पेरणी अपेक्षित असताना केवळ ६५ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली.
रबीत पेरणी क्षेत्रात घट!
भूगर्भासह जलाशयांमध्येही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरणीवर त्याचा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अमरावती विभागात रब्बीच्या पेऱ्यात घट झाली आहे
By admin | Updated: January 18, 2016 00:20 IST2016-01-18T00:20:04+5:302016-01-18T00:20:04+5:30
भूगर्भासह जलाशयांमध्येही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरणीवर त्याचा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अमरावती विभागात रब्बीच्या पेऱ्यात घट झाली आहे
