नवी दिल्ली : चीनमधील बाजारांत सत्राच्या अंतिम टप्प्यात मोठी सुधारणा झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारांत तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२४ अंकांनी वाढून २५,३१७.८७ अंकांवर बंद झाला. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वाढून ७,६00 अंकांच्या वर चढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती, बडे सीईओ, बँकर्स, अर्थतज्ज्ञ आणि मंत्र्यांच्या एका बैठकीत आर्थिक वाढीच्या मुद्यावर विचारविनिमय केला. या बैठकीमुळेही चांगला संदेश गुंतवणूकदारांत
गेला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीनेच उघडला होता. लवकरच त्याने २५ हजारांची पातळी पुन्हा एकदा प्राप्त केली. मधल्या काळात नफावसुलीचा रेटा वाढल्याने सेन्सेक्स घसरून पुन्हा २५ हजारांच्या खाली गेला. दुपारच्या सत्रात त्याने पुन्हा एकदा उसळी घेतली. सत्राच्या अखेरीस ४२४.0६ अंकांची अथवा १.७0 टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २५,३१७.८७ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ८७0.९७ अंकांची घसरण नोंदविली होती.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टीनेही मोठी उसळी घेतली होती. एका क्षणी तो ७,७२0.९0 अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अखेरीस १२९.४५ अंकांची अथवा १.७१ टक्क्यांची वाढ नोंदवून तो ७,६८८.२५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २६ कंपन्यांचे समभाग आज वाढले. बीएसईमध्ये गेलचा समभाग सर्वाधिक ६.४८ टक्क्यांनी वाढला. ५.९७ टक्क्यांच्या वाढीसह टाटा स्टील दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याशिवाय आयसीआयसीआय बँक, वेदांता, एलअँडटी, एमअँडएम, एसबीआय, टाटा मोटर्स, एचडीएफसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, आरआयएल, मारुती सुझुकी, विप्रो, ओएनजीसी, हिंदाल्को, हीरो मोटोकॉर्प आणि सन फार्मा यांचे समभागही
वाढले.
बीएसई मीडकॅप १.0२ टक्क्यांनी वाढला. तसेच स्मॉलकॅप 0.६0 टक्क्यांनी वाढला. क्षेत्रनिहाय विचार करता बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक ३.६१ टक्क्यांनी वाढला. ऊर्जा, भांडवली वस्तू, जमीनजुमला आणि धातू या क्षेत्रांचे निर्देशांक त्याखालोखाल वाढले. (वृत्तसंस्था)
शेअर बाजारास खरेदीचे बळ
चीनमधील बाजारांत सत्राच्या अंतिम टप्प्यात मोठी सुधारणा झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारांत तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२४ अंकांनी वाढून
By admin | Updated: September 9, 2015 04:00 IST2015-09-09T04:00:01+5:302015-09-09T04:00:01+5:30
चीनमधील बाजारांत सत्राच्या अंतिम टप्प्यात मोठी सुधारणा झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारांत तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२४ अंकांनी वाढून
