Lokmat Money > बिझनेस न्यूज > जवाहिऱ्यांच्या खरेदीमुळे सोने आणखी उजळले

जवाहिऱ्यांच्या खरेदीमुळे सोने आणखी उजळले

जागतिक बाजारपेठेत असलेला उठाव आणि त्यामुळे स्थानिक बाजारात जवाहिऱ्यांनी चालविलेले खरेदीसत्र यामुळे मंगळवारी सोने १५० रुपयांनी वधारले, तर चांदीही चकाकली.

By admin | Updated: December 23, 2015 02:17 IST2015-12-23T02:17:29+5:302015-12-23T02:17:29+5:30

जागतिक बाजारपेठेत असलेला उठाव आणि त्यामुळे स्थानिक बाजारात जवाहिऱ्यांनी चालविलेले खरेदीसत्र यामुळे मंगळवारी सोने १५० रुपयांनी वधारले, तर चांदीही चकाकली.

The purchase of jewelery makes gold more brighter | जवाहिऱ्यांच्या खरेदीमुळे सोने आणखी उजळले

जवाहिऱ्यांच्या खरेदीमुळे सोने आणखी उजळले

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत असलेला उठाव आणि त्यामुळे स्थानिक बाजारात जवाहिऱ्यांनी चालविलेले खरेदीसत्र यामुळे मंगळवारी सोने १५० रुपयांनी वधारले, तर चांदीही चकाकली.
सोमवारीही सोन्याला उठाव होता. मंगळवारीही तेच सत्र कायम राहिले. सोने १५० रुपयांनी वधारून २५,७५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदी २५० रुपयांनी वधारून ३४,१०० रुपये प्रतिकिलो झाली. औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदी वधारली.
आज जागतिक बाजारात सोन्याला उठाव होता. त्याचा चांगला परिणाम येथील जवाहिऱ्यांवर झाला. त्यामुळे या मौल्यवान धातूला चांगली मागणी होती, असे सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर न्यूयॉर्क येथे सोने १.१३ टक्क्यांनी वधारून ते १,०७८.२० अमेरिकी डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीही १.१७ टक्क्यांनी वधारून १४.२५ अमेरिकी डॉलर प्रतिऔंस झाली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव १५० रुपयांनी वधारून अनुक्रमे २५,७५० रुपये आणि २५,६०० रुपये झाले.
चांदीच्या नाण्याचेही भाव हजार रुपयांनी वाढले. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ४८ हजार रुपये,
तर विक्रीचा दर ४९ हजार रुपये
होता.

Web Title: The purchase of jewelery makes gold more brighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.