जालंधर : पंजाबच्या बाजारांमध्ये सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या गव्हाची उचल होत नसून मोबदलाही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
पंजाबमध्ये एक एप्रिलपासून गहू खरेदीची व्यवस्था करण्यात आली होती. बाजारांत गव्हाची प्रचंड आवकही झाली; मात्र अवकाळी पाऊस होऊन गहू नरम पडल्यामुळे सरकारी विभाग मुक्तपणे खरेदी करू शकत नव्हते. तथापि, गेल्या पंधरवड्यापासून गहू खरेदीस वेग आला आहे; मात्र गव्हाची उचल होत नसून त्याचा मोबदला वेळेवर दिला जात नसल्यामुळे शेतकरी हैराण आहेत.
जालंधरचे बाजार गव्हाने ओसंडून वाहत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील बाजारांमध्ये गव्हाची जवळपास ३.८३ लाख टनांहून अधिक खरेदी झाली; मात्र खरेदी करण्यात आलेला गहू उचलणे आणि त्याचा शेतकऱ्यांना मोबदला देणे या प्रक्रिया वेळेवर होताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील इतर बाजारांचीही हीच परिस्थिती आहे.
सरकारला शेतकऱ्यांची अजिबात कणव नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सरकार आपल्याबाबत काहीही विचार करीत नाही. असे वाटते की शेतीत आता काही राम राहिलेला नाही. त्यामुळे आपण दुसऱ्या पर्यायांच्याही शोधात आहोत, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
जालंधरच्या बाजारात गहू विकण्यासाठी आलेले सुविंदरसिंग म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी येथील सर्वांत मोठी समस्या येथील सरकार आहे. सरकार सुधरले तर शेतकऱ्यांची स्थितीही सुधारेल. (वृत्तसंस्था)
एकूण परिस्थिती पाहता असे वाटते की, शेतीत आता काही उरलेले नाही. आम्हाला दुसऱ्या पर्यायांकडे पाहावे लागेल.
पंजाबातील गहू उत्पादक सरकारी दिरंगाईने हैराण
पंजाबच्या बाजारांमध्ये सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या गव्हाची उचल होत नसून मोबदलाही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
By admin | Updated: May 5, 2015 22:37 IST2015-05-05T22:37:08+5:302015-05-05T22:37:08+5:30
पंजाबच्या बाजारांमध्ये सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या गव्हाची उचल होत नसून मोबदलाही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
