जञानेश दुधाडेअहमदनगर : गेल्या ४७ वर्षात विधानसभेच्या स्थापनेपासून जिल्ात ५४५ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभेत जाण्याचे स्वप्न पाहिले. यातून अकरा उमेदवारांनी यात यश मिळविले. यात बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, शिवाजी कर्डिले, तुकाराम गडाख आणि नवनीतभाई बार्शीकर यांचा समावेश आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यंदा अनेक मतदारसंघात चौरंगी, पंचरंगी निवडणूक रंगणार आहे. तर अपक्षांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, अपक्षांची ही परंपरा आताची नसून जिल्ातील अनेक मतदारसंघात ती १९६७ पासून आलेली आहे. त्यात १९९०च्या दशकात मोठी वाढ झाली. पक्षाने योग्य, लोकप्रिय, लायक उमेदवारांना ऐनवेळी पक्षाचे तिकीट नाकारल्याने इच्छुक निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष उतरले होते. जिल्ात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून अनेक दिग्गज विजयी झाल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे त्या काळात पक्षावर निष्ठा ठेवणार्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात हे अपक्ष यशस्वी झालेले आहेत. जिल्ातील मतदारसंघात अपक्षांची संख्या १९९५ मध्ये सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. यात शेवगाव २०, नगर (उत्तर) आताचा नेवासा १७, नगर (दक्षिण) १८, श्रीरामपूर १०, राहुरी १२, कोपरगाव ११, कर्जत ९ अशी अपक्ष उमेदवारांची संख्या होती.अपक्ष उमेदवारी करणे सोपे नाही. यासाठी स्वत:ची यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, तरी देखील जिल्ातील अकरा अपक्षांनी पहिल्याच प्रयत्नात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकली आहे. तर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत केले आहे. यात निवडून आलेल्या काहींनी तर राज्याच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. यात बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे यांचा समावेश आहे. बबनराव पाचपुते यांनी २००४ मध्ये अपक्ष म्हणून तिसर्यांदा निवडणूक लढविली आणि त्यात विजयी झाले. त्यापूर्वी ते दोनदा जनता पक्षाकडून निवडून आलेले होते. आजवर निवडणूक लढविलेल्या अपक्षांची संख्यानगर ६२, कर्जत ४८, श्रीगोंदा ३९, नगर (उत्तर) आताचा नेवासा ४६, पाथर्डी ३८, शेवगाव ५२, श्रीरामपूर ६८, शिर्डी ३६, कोपरगाव २९, राहुरी ३५, पारनेर ३४, संगमनेर ३४, अकोले २४ यांचा समावेश आहे. .........................अपक्ष विजयीबाळसाहेब थोरात (१९८५, संगमनेर), प्रसाद तनपुरे (१९८५, राहुरी), शंकरराव कोल्हे (१९७२, कोपरगाव), बबनराव पाचपुते (२००४, श्रीगांेदा), बी.एम. भारस्कर (१९७२, श्रीगोंदा), नवनीतभाई बार्शीकर (१९७२, नगर दक्षिण), शिवाजी कर्डिले दोनदा (१९९५, १९९९ नगर उत्तर), बी.आर. म्हस्के (१९७२, पाथर्डी), तुकाराम गडाख (१९९०, शेवगाव), एम.के .गाडे (१९६७, कोपरगाव).
(पुणे सुपरव्होटसाठी) अकरा अपक्ष पोहचले विधानसभेत थोरात, कोल्हे, तनपुरे, कर्डिले, गडाख, बार्शीकरांचा प्रारंभ अपक्ष
ज्ञानेश दुधाडे
By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST2014-09-29T21:46:39+5:302014-09-29T21:46:39+5:30
ज्ञानेश दुधाडे
