Lokmat Money > बिझनेस न्यूज > (पुणे सुपरव्होटसाठी) काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपही आमचे टार्गेट रामदास कदम : मोदींचा मात्र आजही आदर

(पुणे सुपरव्होटसाठी) काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपही आमचे टार्गेट रामदास कदम : मोदींचा मात्र आजही आदर

शिर्डी : भाजपाचे टार्गेट शिवसेना नसली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर भाजपाही आमचे टार्गेट आहे, दिल्लीवरुन आजवर जे सुपारी घेऊन आले ते सर्व संपले, अशा भाषेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपाविषयी असलेला संताप व्यक्त केला़

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:28+5:302014-10-03T22:56:28+5:30

शिर्डी : भाजपाचे टार्गेट शिवसेना नसली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर भाजपाही आमचे टार्गेट आहे, दिल्लीवरुन आजवर जे सुपारी घेऊन आले ते सर्व संपले, अशा भाषेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपाविषयी असलेला संताप व्यक्त केला़

(For Pune Supervot) Congress-NCP and BJP also target our target Ramdas Kadam: Modi's respect today | (पुणे सुपरव्होटसाठी) काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपही आमचे टार्गेट रामदास कदम : मोदींचा मात्र आजही आदर

(पुणे सुपरव्होटसाठी) काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपही आमचे टार्गेट रामदास कदम : मोदींचा मात्र आजही आदर

र्डी : भाजपाचे टार्गेट शिवसेना नसली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर भाजपाही आमचे टार्गेट आहे, दिल्लीवरुन आजवर जे सुपारी घेऊन आले ते सर्व संपले, अशा भाषेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपाविषयी असलेला संताप व्यक्त केला़
साईदर्शनासाठी आलेल्या रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदींचा आम्ही आजही आदर करतो़ मात्र महाराष्ट्रापासून विदर्भ तोडण्याचे स्वप्न पाहणार्‍या भाजपातील नेत्यांनी युती तोडण्यात महत्वाची भूमिका बजावली़ राज्यातील भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे़ विधानसभा निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यात येईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला़ निवडणुकीनंतर भाजपाशी पुनर्विवाह होईल का, यावर बोलताना कदम यांनी याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असे सांगितले़ यावेळी सचिन कोते, विजय काळे आदींची उपस्थिती होती़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: (For Pune Supervot) Congress-NCP and BJP also target our target Ramdas Kadam: Modi's respect today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.