पणे : गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून राबविल्या जाणार्या उपाय योजनांची माहिती अहमदाबाद महापालिकेने मागवली आहे. या उत्सवासाठी अहमदाबाद महापालिकेकडून विशेष धोरण तयार करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेला पुण्यातील गणेशोत्सव जगभरात नावाजलेला आह़े महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गुजराती नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्येही मराठी बांधवांची संख्या मोठी आहे. तसेच त्या ठिकाणचे स्थानिक रहिवाशीही हा उत्सव दहा दिवस मोठय़ा प्रमाणात साजरा करतात. या उत्सवासाठी अहमदाबाद महापालिकेकडून पुढील वर्षापासून नवीन स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेकडून शहरातील गणेशमंडळांसाठी राबविल्या जाणार्या धोरणाची माहिती महापालिकेकडे माग़विण्यात आली आहे. त्यात महापालिकेडून पालिकेच्या जागांमध्ये, रस्त्यांवर, तसेच प्रमुख चौकांमध्ये मंडळांना परवानगी देताना, कोणते निकष पाहिले जातात, ही परवानगीची यंत्रणा कशा प्रकारे राबविली जाते, परवानगीसाठी किती शुल्क आकारले जाते, ही माहिती मागविण्यात आली आहे. त्यासाठीचे पत्र अहमदाबाद महापालिकेचे इस्टेट अधिकारी पी.एन राऊत यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठविले आहे. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़धोरण नाही; मात्र, इतर माहिती कळविणार पुणे महापालिकेकडून या उत्सवासाठीचे कोणतेही धोरण तयार केलेले नाही. मात्र, या उत्सवासाठी गणेशमंडळांना मंडप घालण्यासाठी तसेच त्यासाठी खोदाई, वीज पुरवठा घेण्यासाठी सुरक्षा ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मंडळांना उत्सवासाठी ही परवानगी देण्यात येत आहे. ही नियमावली अहमदाबाद महापालिकेस पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या उत्सवासाठी अहमदबाद महापालिका धोरण तयार करू शकते तर पुणे महापालिका का नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे.-------------------------------
ंअहमदबादमध्ये पोहचणार गणेशोत्सवाचा पुणे पॅटर्न
पुणे : गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून राबविल्या जाणार्या उपाय योजनांची माहिती अहमदाबाद महापालिकेने मागवली आहे. या उत्सवासाठी अहमदाबाद महापालिकेकडून विशेष धोरण तयार करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेला पुण्यातील गणेशोत्सव जगभरात नावाजलेला आह़े
By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:13+5:302014-09-07T00:04:13+5:30
पुणे : गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून राबविल्या जाणार्या उपाय योजनांची माहिती अहमदाबाद महापालिकेने मागवली आहे. या उत्सवासाठी अहमदाबाद महापालिकेकडून विशेष धोरण तयार करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेला पुण्यातील गणेशोत्सव जगभरात नावाजलेला आह़े
