मुंबई : पुणेस्थित उद्योगपती सायरस पूनावाला यांनी मुंबईतील बहुचर्चित लिंकन हाऊस ७५० कोटी रुपयांत खरेदी केले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत रिअल इस्टेट संपत्तीच्या बाबतीत झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा सौदा आहे.
लिंकन हाऊस दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅण्डी परिसरात आहे. ही इमारत खरेदी करणारे सायरस पूनावाला हे ‘सेरम इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष आहेत. या कंपनीत सर्पदंशावर उपचार करणाऱ्या औषधींची निर्मिती केली जाते.
एक आठवड्यापूर्वीच उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी मलबार हिल येथील जटिया हाऊस ४२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यावेळी रिअल इस्टेटमधील हा एक मोठा सौदा समजला गेला होता. खरे तर ‘लिंकन हाऊस’चा उपयोग अमेरिकी वाणिज्य दूतावास म्हणून होत होता. आता पूनावाला या इमारतीचा कौटुंबिक वापरासाठी उपयोग करणार आहेत. या इमारतीसाठी अमेरिकेने ८५० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती; तरी पण त्यापेक्षा कमी किंमत देऊन पूनावाला यांनी ती खरेदी केली.
यासंदर्भात अमेरिकी वाणिज्य दूतावास आणि पूनावाला या दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही.
पुनावाला यांनी खरेदी केले ७५० कोटींचे घर
पुणेस्थित उद्योगपती सायरस पूनावाला यांनी मुंबईतील बहुचर्चित लिंकन हाऊस ७५० कोटी रुपयांत खरेदी केले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत रिअल इस्टेट संपत्तीच्या बाबतीत झालेला
By admin | Updated: September 14, 2015 00:54 IST2015-09-14T00:54:09+5:302015-09-14T00:54:09+5:30