Lokmat Money > बिझनेस न्यूज > काठीपाडाला वसतिगृहाची सोय करा

काठीपाडाला वसतिगृहाची सोय करा

आदिवासी विकास आयुक्तांना चिंतामण गावित यांचे साकडे

By admin | Updated: June 23, 2014 22:51 IST2014-06-23T22:44:26+5:302014-06-23T22:51:08+5:30

आदिवासी विकास आयुक्तांना चिंतामण गावित यांचे साकडे

Provide hostels to Kathipada | काठीपाडाला वसतिगृहाची सोय करा

काठीपाडाला वसतिगृहाची सोय करा

आदिवासी विकास आयुक्तांना चिंतामण गावित यांचे साकडे
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठीपाडा येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह नसून, येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होेत आहे. वसतिगृह सुरू न केल्यास २९ जूनपासून आदिवासी विद्यार्थी व पालक आदिवासी विकास आयुक्तालयासमोर उपोषण करतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य चिंतामण गावित यांनी आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना दिला आहे.
सोमवारी आदिवासी विकास आयुक्तालयासमोर चिंतामण गावित यांच्यासह आदिवासी विद्यार्थी व पालकांनी निदर्शने करून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरगाणा तालुका अतिदुर्गम असून, आदिवासी मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना अनंत अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काठीपाडा येथील वसतिगृहाचा प्रस्ताव पाठवूनही वसतिगृह मंजूर होत नाही. विशेष म्हणजे काठीपाडा येथे चार कनिष्ठ महाविद्यालये आहेत. मात्र वसतिगृहाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. आदिवासी विद्यार्थी मध्येच शिक्षण सोडतात. तरी काठीपाडा येथे तत्काळ वसतिगृह सुरू करावे, अन्यथा २९ जूनला आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आदिवासी पालक व विद्यार्थी धरणे आंदोलन व उपोषण करतील, असा इशारा दिला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Provide hostels to Kathipada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.