अोला : कीर्तीनगरमधील जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावणार्या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरात हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या भूमिकेचा रामदेव बाबा सेवा समिती, श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. समिती व भाजपच्यावतीने शुक्रवारी रात्री मोठ्या राम मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रामदेव बाबा यांची दिव्य ज्योत अकोल्यात दाखल झाल्याच्या निमित्ताने जम्मा जागरण, रामदेव बाबा सेवा समिती व टेकडीवाल परिवाराच्यावतीने २८ ऑगस्ट रोजी कीर्तीनगरमधील एका खासगी भूखंडावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भूखंडावर उभारण्यात आलेल्या मंडपासाठी महापालिकेची परवानगी नसल्याच्या मुद्यावरून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, अतिक्रमण विभागप्रमुख विष्णू डोंगरे व इतर कर्मचार्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंडपात महाप्रसादाचा लाभ घेणार्या महिलांना अर्धवट जेवण सोडून उठावे लागले. यावेळी अतिक्रमण पथकाने मंडपातील साहित्य जप्त करून ट्रकमध्ये भरले. मनपाच्या अतिरेकी कारवाईचा उपस्थित नागरिकांनी तीव्र शब्दात विरोध दर्शविल्यानंतर अधिकार्यांनी काढता पाय घेतला. या प्रकारामुळे रामदेव बाबा सेवा समिती, श्री रामनवमी शोभायात्रा समितीने खदान पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर २९ ऑगस्ट रोजी मोठ्या राम मंदिरात निषेध बैठकीचे आयोजन केले होते. उपायुक्त चिंचोलीकर कनिष्ठ अधिकार्यांच्या मर्जीने कारवाया करीत असून, हा प्रकार कदापि खपवून घेणार नसल्याचा सूर बैठकीत उमटला. या सर्व प्रकाराला मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे पाठबळ असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बैठकीला रामदेव बाबा सेवा समिती, श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी तसेच आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ.गोवर्धन शर्मा, हरीश आलीमचंदानी, डॉ.अशोक ओळंबे, सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, अजय शर्मा, विजय इंगळे तसेच व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. -फोटो-३०सीटीसीएल-९०-
मनपाच्या हुकूमशाहीचा तीव्र निषेध सेवा समितीची मोठ्या राम मंदिरात बैठक
अकोला : कीर्तीनगरमधील जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावणार्या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरात हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या भूमिकेचा रामदेव बाबा सेवा समिती, श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. समिती व भाजपच्यावतीने शुक्रवारी रात्री मोठ्या राम मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:16+5:302014-08-29T23:33:16+5:30
अकोला : कीर्तीनगरमधील जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावणार्या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरात हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या भूमिकेचा रामदेव बाबा सेवा समिती, श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. समिती व भाजपच्यावतीने शुक्रवारी रात्री मोठ्या राम मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
