नवी दिल्ली : मोठी महानगरे आणि इतर परिवहन व्यवस्थांसह दुकानांत खरेदीसाठीही वापरता येईल अशा स्मार्ट कार्डचा प्रस्ताव शहर विकास मंत्रालयाने तयार केला आहे. हे कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या (एनसीएमसी) धर्तीवर करण्याचा विचार आहे. असे कार्ड लवकरात लवकर उपलब्ध व्हावे यासाठी वेगवेगळ्या एजन्सीजना त्याचे काम द्यावे, असे आदेश शहर विकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी अधिकाऱ्यांना दिले.
संपूर्ण देशासाठी इंटर आॅपरेबल सिस्टीमला मान्यताही देण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नायडूंनी या योजनेसाठी राज्यांकडून सहकार्य मागितले आहे. कारण तेथे सध्या कार्यरत असलेल्या योजनांशी या कार्डचा समन्वय राखता येईल. अशा प्रकारचे कार्ड वापरात आणण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर नायडू यांनी जगात अशा प्रकारच्या कार्डच्या वेगवेगळ्या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीने केलेल्या शिफारशींनंतर मंत्रालयाने ‘एनसीएमसी’चा प्रस्ताव तयार केला.
बहुपयोगी स्मार्ट कार्ड वापरण्याचा देशात प्रस्ताव
मोठी महानगरे आणि इतर परिवहन व्यवस्थांसह दुकानांत खरेदीसाठीही वापरता येईल अशा स्मार्ट कार्डचा प्रस्ताव शहर विकास मंत्रालयाने तयार केला आहे
By admin | Updated: September 2, 2015 00:07 IST2015-09-01T22:34:36+5:302015-09-02T00:07:58+5:30
मोठी महानगरे आणि इतर परिवहन व्यवस्थांसह दुकानांत खरेदीसाठीही वापरता येईल अशा स्मार्ट कार्डचा प्रस्ताव शहर विकास मंत्रालयाने तयार केला आहे
