नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्रातील बॅँकांच्या क्रेडिट कार्डांच्या व्यवहारात, तसेच व्यक्तिगत कर्जाच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम खासगी क्षेत्रातील विविध बॅँकांच्या तारणविरहित कर्जावरील नफ्यात मोठी वाढ होण्यात झाला आहे.
देशातील कंपन्यांमध्ये मंदीचे वातावरण असल्यामुळे त्यांच्याकडून कर्जाची मागणी कमी होत असतानाच बॅँकांच्या क्रेडिट कार्ड आणि व्यक्तिगत कर्जाच्या व्यवहारांमध्ये वाढ झालेली दिसून आल्याने बॅँकांच्या नफ्यामध्ये वाढ होण्यास त्याने हातभार लावला आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या जाहीर झालेल्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे.
आयसीआयसीआय या भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बॅँकेच्या व्यक्तिगत कर्जाच्या वाटपामध्ये १४१.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या व्यवसायामध्येही २०.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.ॲक्सिस बॅँक या खासगी क्षेत्रातील दुसर्या बॅँकेच्या व्यक्तिगत कर्ज वाटपामध्ये ४९.८ टक्के, तर क्रेडिट कार्डाच्या व्यवहारांमध्ये ३१.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
क्रेडिट कार्डच्या व्यवसायातील अव्वल खेळाडू असलेल्या एचडीएफसी बॅँकेचा कार्डांचा व्यवसाय २१ टक्क्यांनी वाढला आहे तर बॅँकेने दिलेल्या व्यक्तिगत कर्जांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विविध एटीएम आणि पॉइंट ऑफ सेलच्या माध्यमातून होणार्या व्यवहारांमध्येही मागील आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बॅँकेच्या व्यवहारांमध्ये ३१ टक्के, तर ॲक्सिस बॅँकेचे व्यवहार ८६ टक्क्यांनी वाढले असल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे. क्रेडिट कार्डच्या व्यवसायामध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बॅँकाही या व्यवसायामध्ये उतरण्यास उत्सुक असलेल्या दिसून येतात.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
------------------------
अहवाल जाहीर: क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्जात वाढ
- वर्ल्डलाईन इंडियाच्या अहवालामध्ये मागील आर्थिक वर्षामध्येच क्रेडिट कार्ड धारकांची संख्या २० दशलक्षांहून अधिक झाली आहे.
- भारतातील क्रेडिट कार्डच्या व्यवसायामध्ये खासगी क्षेत्रातील बॅँकांचा वाटा ५४ टक्के आहे.
- २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांचा क्रेडिट कार्ड व्यवसायातील वाटा १८ टक्के होता तो वाढून आता २० टक्क्यांवर पोहोचला आहे.
- भारतीय रिझर्व्ह बॅँकेने युरो पे मास्टर कार्ड व्हिसा (ईएमव्ही) सक्तीचे केल्यानंतर भारतातील क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली आहे.
खासगी बॅँकांच्या नफ्यामध्ये मोठी वाढ
देशातील खासगी क्षेत्रातील बॅँकांच्या क्रेडिट कार्डांच्या व्यवहारात, तसेच व्यक्तिगत कर्जाच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
By admin | Updated: May 5, 2014 14:23 IST2014-05-04T23:54:10+5:302014-05-05T14:23:15+5:30
देशातील खासगी क्षेत्रातील बॅँकांच्या क्रेडिट कार्डांच्या व्यवहारात, तसेच व्यक्तिगत कर्जाच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
