तुण मूर्तिकार दिनेश बगलेचे आवाहन औरंगाबाद : शहरातील मूर्तिकारांना नवनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी गणेश महासंघाने दरवर्षी उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार करणार्या मूर्तिकारांना पुरस्कार द्यावा, असे आवाहन तरुण मूर्तिकार दिनेश बगलेने केले आहे. मुकुंदवाडी परिसरातील अवघा २२ वर्षांचा हा तरुण मूर्तिकार आज शहरातील नामांकित सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती तयार करीत आहे. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीची प्रतिकृती तयार करण्याचे कामही हाच तरुण करीत आहे. दिनेशने सांगितले की, माझे वडील मूर्तिकार कै. रतन बगले यांनी शहरात तीन मोठ्या गणेशमूर्ती तयार केल्या. एवढेच नव्हे तर शहरातील नामांकित गणेश मंडळांमध्ये त्यांनी तयार केलेल्याच मूर्ती आज बसवितात. त्या मूर्तीचे विसर्जन करीत नाहीत. गणेश महासंघाने वडिलांच्या कार्याची दखल घेऊन आता दरवर्षी जे मूर्तिकार उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार करतील त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. त्यामुळे शहरातील मूर्तिकारांना प्रोत्साहन मिळेल व उदयोन्मुख मूर्तिकारांना प्रेरणा मिळेल. दिनेश पुढे म्हणाला की, गणेश मंडळाचे पदाधिकारी मूर्ती पाहिल्यावर आमची तोंडभरून कौतुक करतात. मात्र, जेव्हा खरेदीची वेळ येते तेव्हा मातीमोल भावात खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो. कौतुक केल्याने पोट भरत नाही. कारण, मूर्ती तयार करण्यासाठी तासन्तास मेहनत घ्यावी लागते. मोठ्या मूर्तीसाठी दिवसेंदिवस लागतात. वर्षभराचा आमचा हाच व्यवसाय असतो. या सर्वांचा विचार करून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती मातीमोल भावात खरेदी करण्याची आपली मानसिकता सोडून द्यावी. मूर्तीच्या किमतीपेक्षा कलात्मकतेकडे पाहावे. घरगुती गणपती खरेदी करणारे मात्र, आता गणेशमूर्तीच्या कलात्मकतेकडे अधिक लक्ष देत आहेत. हीच आमच्या दृष्टीने समाधानाची बाब होय. कॅप्शनदगडूशेठ हलवाईच्या मूर्तीच्या प्रतिकृतीचे डोळे साकारताना तरुण मूर्तिकार दिनेश बगले.
्नग्लेज पुरवणीसाठी बातमी नं५ उत्कृष्ट गणेशमूर्तीला पुरस्कार द्यावा
तरुण मूर्तिकार दिनेश बगलेचे आवाहन
By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:37+5:302014-08-28T20:55:37+5:30
तरुण मूर्तिकार दिनेश बगलेचे आवाहन
