अोला : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील साफसफाईचा प्रश्न बिकट झाला असून, अस्वच्छतेअभावी नागरिकांना साथ रोगांनी बेजार करून सोडले आहे. प्रशासकीय प्रभागांसह पडीतच्या २० प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य साचले असताना, महापालिका प्रशासन मात्र खासगी सफाई कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र बुधवारी समोर आले. अर्थातच, कंत्राटदारांची देयके अदा करतेवेळी मनपा अधिकार्यांनी हात ओले केल्याच्या शंकेला बळ मिळत आहे. शहरातील ३६ प्रभागांपैकी पडीतच्या २० प्रभागात नियमित साफसफाई व स्वच्छतेच्या कामासाठी खासगी कंत्राटदारांची नियुक्ती प्रशासनाने केली. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट संबंधित नगरसेवक किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळवले आहेत. प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाईन, रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासह झाडे-झुडपे, गवत काढण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी १५ खासगी सफाई कर्मचार्यांची नियुक्ती केली असून, या बदल्यात मनपाकडून महिन्याकाठी ५० हजार रुपयांची घसघशीत रक्कम कंत्राटदारांच्या खिशात कोंबल्या जाते. अर्थातच, पडीत प्रभागात दैनंदिन ६०० सफाई कर्मचारी काम करतात, असे विरोधाभासी चित्र नगरसेवक ांकडून भासवल्या जात आहे. सभागृहात सर्वच नगरसेवक प्रभागात नियमित साफसफाई होत नसल्याचे खापर प्रशासनाच्या मस्तकी फोडतात. मात्र, खासगी कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याची भाषा कोणीही वापरत नाही, हे येथे उल्लेखनीय. पडीत प्रभाग निव्वळ देयके लाटण्याचे कुरण बनले असून, ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्व्हिस लाईनमध्ये प्रचंड घाण, कचर्याचे ढीग साचल्याचे चित्र २७ ऑगस्ट रोजी प्रभारी आयुक्त चंद्रशेखर गुल्हाणे, क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर यांच्या पाहणीत समोर आले.
खासगी सफाई कंत्राटदारांना मनपाचे अभय पडीतच्या २0 प्रभागांना घाणीचा विळखा नगरसेवकांचे हितसंबंध; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अकोला : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील साफसफाईचा प्रश्न बिकट झाला असून, अस्वच्छतेअभावी नागरिकांना साथ रोगांनी बेजार करून सोडले आहे. प्रशासकीय प्रभागांसह पडीतच्या २० प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य साचले असताना, महापालिका प्रशासन मात्र खासगी सफाई कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र बुधवारी समोर आले. अर्थातच, कंत्राटदारांची देयके अदा करतेवेळी मनपा अधिकार्यांनी हात ओले केल्याच्या शंकेला बळ मिळत आहे.
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:20+5:302014-08-27T21:30:20+5:30