नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्राच्या व्यावसायिक घडामोडीत मार्चमध्ये उल्लेखनीय वृद्धी झाली. या महिन्यात ती ३६ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचली. नवीन कंत्राटात वाढ झाल्यामुळे असे झाल्याचे निक्केई इंडियाच्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
निक्केई इंडिया संमिश्र पीएमआय उत्पादन सूचकांक मार्चमध्ये ३७ महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर म्हणजे ५४.३ वर पोहोचला. फेब्रुवारीत तो ५१.२ वर होता. हा सूचकांक बांधकाम आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांचे आकलन करतो.
बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात तेजी येत आहे. त्यामुळे उत्पादन वृद्धीत या क्षेत्राचे योगदान राहिले. दरम्यान, निक्केई सेवा व्यवसाय घडामोडीचा सूचकांक मार्चमध्ये ५४.३ वर पोहोचला. तो जून २0१४ पासून आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर आहे. फेब्रुवारीत सूचकांक ५१.४ वर होता. सूचकांक ५0 पेक्षा वर असेल, तर वृद्धी आणि ५0 पेक्षा कमी असेल, तर नकारात्मक असा त्याचा अर्थ समजला जातो. लिमा म्हणाल्या की, २0१५-१६ या वर्षात रोजगाराच्या क्षेत्रात फारसा बदल झालेला नाही, ही निराशाजनक बाब आहे. आगामी १२ महिन्यांत यात सुधारणा होईल, अशी आशा भारतीय सेवा कंपन्यांनी व्यक्त केली आहे.या सर्वेक्षणाचे आकलन करणारी संस्था मार्केटच्या अर्थतज्ज्ञ पॉलियानाडी लिमा म्हणाल्या की, मार्च पीएमआयच्या सर्वेक्षणात मावळलेले वित्तीय वर्ष समाधानकारक होते, असा त्यातून संदेश मिळतो.या सर्वेक्षणाचे आकलन करणारी संस्था मार्केटच्या अर्थतज्ज्ञ पॉलियानाडी लिमा म्हणाल्या की, मार्च पीएमआयच्या सर्वेक्षणात मावळलेले वित्तीय वर्ष समाधानकारक होते, असा त्यातून संदेश मिळतो.
खासगी व्यावसायिक घडामोडी तीन वर्षांच्या उच्चांकावर
देशातील खासगी क्षेत्राच्या व्यावसायिक घडामोडीत मार्चमध्ये उल्लेखनीय वृद्धी झाली. या महिन्यात ती ३६ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचली.
By admin | Updated: April 6, 2016 22:48 IST2016-04-06T22:48:49+5:302016-04-06T22:48:49+5:30
देशातील खासगी क्षेत्राच्या व्यावसायिक घडामोडीत मार्चमध्ये उल्लेखनीय वृद्धी झाली. या महिन्यात ती ३६ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचली.
