Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना

सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना

यावर्षी जाहीर झालेल्या पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या योजनेचे स्वरुप काय, त्याचे फायदे

By admin | Updated: September 2, 2015 23:10 IST2015-09-02T23:10:44+5:302015-09-02T23:10:44+5:30

यावर्षी जाहीर झालेल्या पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या योजनेचे स्वरुप काय, त्याचे फायदे

Prime Minister Jeevan Jyoti Insurance Scheme for the common man | सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना

सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना

यावर्षी जाहीर झालेल्या पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या योजनेचे स्वरुप काय, त्याचे फायदे, क्लेम कसा मिळेल आदी अनेक प्रश्न याबाबत विचारले जात आहेत. त्याची नेमकी उत्तरे वित्त मंत्रालयाने दिली असून वाचकांच्या माहितीसाठी आम्ही ती येथे देत आहोत.

प्र. १. योजनेचे स्वरुप कसे आहे?
या योजनेत वर्षभरासाठी मुदत जीवन विमा योजना (टर्म लाईफ इन्शुरन्स) संरक्षण राहील ज्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल. यात कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण देण्यात येईल.
प्र. २. या योजनेत कसा फायदा मिळेल आणि त्याचे विमा प्रीमियम कसे राहील?
सदस्याचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मिळतील. या योजनेचा विमा प्रीमियम हा दर वर्षाला रुपये ३३०/- याप्रमाणे प्रत्येक सदस्याने द्यावयाचा आहे.
प्र. ३. प्रीमियम कसे देता येईल?
प्रत्येक वर्षात जोपर्यंत योजना चालू आहे तोपर्यंत खातेधारकाच्या बचत खात्यातून परस्पर रुपये काढण्याच्या निर्देशानुसार एकदाच जसे योजनेत सहभागी होताना पर्याय निवडला असेल तसा घेण्यात येईल. योजना कार्यान्वित राहीपर्यंत वर्गणीदाराला प्रत्येक वर्षी खात्यातून रुपये काढण्यासाठी एकदाच संमती द्यावी लागेल. या योजनेचा आढावा सरकार दरवर्षी घेत राहील. त्यानुसार पुढील नियम, बदलू शकतात.
प्र. ४. योजना कोण देऊ शकतो, अंमलबजावणी कोण करेल?
ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा निगम एलआयसी किंवा इतर विमा कंपन्याद्वारा राबविली जाईल. ज्या या योजनेच्या नियमानुसार हेतू पूर्ण करण्यासाठी बँकाशी सहमत होईल. सहभागी बँका या त्यांच्या ग्राहकांसाठी अशी योजना राबविण्यासाठी कोणत्याही विमा कंपनीला यात सहभागी करू शकतात.प्र. ५. या योजनेत कुणाला सहभागी होता येईल?
वय वर्ष ५० च्या अगोदर सदस्य झाल्यास ५५ वर्ष वयापर्यंत ही योजना चालू राहील. वर्षे १८ ते ५० या वयोगटातील सहभागी बँकातील सर्व बचत खातेधारक या योजनेसाठी पात्र राहतील. एकाच वेळी अनेक बँकात खाते असणाऱ्या ग्राहकाला फक्त एकच बचत खात्यामार्फत या योजनेत सहभागी होता येईल.
प्र. ६. योजनेत सहभागी होण्याचा कालावधी कोणता आणि त्यातील बदल कसे आहेत?
या योजनेत विमा संरक्षण हे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळासाठी एक वर्षासाठी राहील. त्याची वाढीव मुदत ३१ आॅगस्ट २०१५ ही पहिल्या वर्षासाठीच राहील. यानंतर सहभागी होणाऱ्या वर्गणीदारांना पूर्ण वार्षिक प्रीमियम द्यावे लागेल आणि स्वत: दिलेले स्वत:चे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.
प्र. ७. प्रथम वर्षी सहभागी होऊ न शकणारा पात्र ग्राहक पुढील वर्षी या योजनेत सहभागी होऊ शकतो काय?
हो. परस्पर पैसे काढण्याच्या सेवेनुसार नवीन पात्र सदस्य या योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यांनी प्रीमियम परस्पर खात्यातून वजा करण्याचे निर्देश देऊ सहभागी होता येईल. स्वत: दिलेले स्वत:चे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.
प्र. ८. योजना सोडून जाणारी व्यक्ती परत योजनेत सहभागी होऊ शकते काय?
कोणत्याही क्षणी सोडून जाणारा परत योजनेत सहभागी होऊ शकतो. वार्षिक प्रीमियम देऊन तो योजनेत प्रवेश करू शकतो. त्यासाठी त्याला स्वत: दिलेले स्वत:चे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.
प्र. ९. या योजनेत मास्टर पॉलिसी धारक कोण असेल?
सहभागी बँक ही सहभागी ग्राहकाच्या वतीने मास्टर पॉलिसीधारक असेल. या बँकेने आणि विमा संरक्षण देणारी जीवन विमा कंपनी एलआयसी यांनी साधी सोपी आणि ग्राहक हितदक्ष अस्थापना आणि क्लेम देणारी यंत्रणा उभारावी.
प्र. १०. या योजनेतील सहभागी ग्राहकावरील जीवन संरक्षण केव्हा संपुष्टात येते?
सदस्याचे जीवन संरक्षण हे खालील बाबतीत संपते.
१) जन्म तारखेनुसार वय ५५ झाल्यावर (जी जवळची जन्मतारीख असेल) दरवर्षी वार्षिक सहभाग हा महत्त्वाचा आहे (तरीही वय वर्षे ५० नंतर सहभाग घेता येणार नाही.)
२) बचत खात्यात अपेक्षित शिल्लक नाही म्हणून आणि जीवन विमा प्रीमियम भरण्याच्या असमर्थतेत.
३) जर सदस्य हा एकापेक्षा जास्त बचत खात्यामार्फत या योजनेत संरक्षित असेल तर अशा वेळी एलआयसी/जीवन विमा कंपनीला असे अनेक प्रीमियम प्राप्त झाले तर फक्त २ लाख रुपयाचे जीवन विमा संरक्षण मिळेल आणि अन्य प्रीमियत परत केले जाणार नाहीत.
प्र. ११. प्रीमियमचा तपशील द्या
१) एलआईसी अन्य जीवन विमा कंपनीला प्रत्येक ग्राहक याप्रमाणे २८९/- रुपये वार्षिक असे प्रीमियम राहील.
२) प्रत्येक ग्राहक याप्रमाणे दरवर्षी ३०/- रुपये याप्रमाणे बीसी/माइक्रो/कॉर्पोरेट/एजेंट यांना खर्च देणे.
३) प्रत्येक ग्राहक याप्रमाणे दरवर्षी ११/- रुपये याप्रमाणे बँकेला आस्थापना खर्च मिळेल.
प्र. १२. हे विमा संरक्षण ग्राहकाने घेतलेल्या अन्य विमा संरक्षणाच्या व्यतिरिक्त असेल काय?
होय.
प्र. १३. सर्व जॉर्इंट खातेधारक उल्लेख केला गेलेल्या खात्याद्वारे 'या योजनेत सहभागी होऊ शकतात का?
जर ते पात्रतेचे निकष पूर्ण करत असतील आणि प्रति व्यक्ती दरवर्षी रु. ३३०/- या दराने प्रीमियम (हप्ता) भरत असतील तर सर्व जॉर्इंट खातेधारक उल्लेख केल्या गेलेल्या खात्याद्वारे या योजनेत सहभागी होऊ शकतील.
प्र. १४. परदेशस्थ भारतीय (एन.आर.आय.) कव्हरेज मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत पात्र असतील का?
कुठल्याही भारतीय बँकेच्या शाखेत योग्य बँक खाते असलेला कुणीही परदेशस्थ भारतीय पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्र असेल मात्र योजनेशी संबंधित अटी आणि शर्तींच्या अधीन राहून.
प्र. १५. भारतीय पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी कुठले बँक खाते योग्य असेल.
संस्थांशी संबंधित खाते वगळता सर्व प्रकारच्या खात्यांचे धारक या योजनेसाठी पात्र असतील.
प्र. १६. नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, पूर इ. मुळे होणारे मृत्यु / अपंगपणा या कारणांना ही योजना लागू असेल का? तसेच खून/आत्महत्या यासारख्या घटनांनादेखील ही योजना लागू असेल का?
या वरील सर्व घटना भारतीय पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत कव्हर केल्या जातील.
प्र. १७ . पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसीज (धोरणे) परदेशी विमा पॉलिसीजच्या साहाय्याने सुरू झाल्या आहेत का आणि काम करत आहेत का?
भारतात अशा कुठल्याही परदेशी विमा कंपनीज थेटपणे काम करत नाहीत. विमा कायदा आणि आयआरडीए नियमांनुसार भारतीय कंपनीजबरोबर काही परदेशी नवीन कंपन्या काम करीत आहेत, जेथे त्यांचा समभाग ४९% पर्यंतच मर्यादित
आहे.
४प्र. १८. इतर जीवन विमा सेवांच्या विरुद्ध, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे विमाधारकाच्या वारसास / हक्कदारास मिळतात. इतर जीवन विमा पॉलिसीजमध्ये उपलब्ध असणारे मॅच्युरिटी फायदे किंवा सरेंडर व्हॅल्यू इथे का नसते?
या योजनेतचे कव्हर फक्त मृत्यूनंतर मिळते आणि म्हणूनच फक्त विमाधारकाच्या वारसास / हक्कदारासच मिळते. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ही प्युअर टर्म पॉलिसी आहे, ज्यात कुठलाही गुंतवणुकीचा भाग समाविष्ट नसून ती मृत्यूबाबतच्या घटना कव्हर करते. इतर पॉलिसीजच्या मानाने किंमतही कमी आहे. समाजातील दुर्बल घटकांना जीवन विम्याचे फायदे देण्यासाठी ही योजना तयार केली आहे. म्हणूनच गुंतवणुकीचा भाग टाळून प्रीमियम (हप्ता) ही कमी ठेवला आहे.
प्र. १९. हप्त्याचे दर वाढू शकतात किंवा कंपनीज भविष्यात योजना बंद करू शकतात का?
विमा हा इतर सेवांसारखाच असतो. हप्त्याचे दर भविष्यात वाढू शकतात, २४ भारतीय विमा कंपनीत असलेल्या स्पर्धेमुळे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व्यवहार्य असेल तर ती बंद व्हायची शक्यता कमी आहे. जर काही विशिष्ट परिस्थितीत असे काही घडले तर बँकेकडे इतर ठिकाणी भागीदारी करण्याचे पर्याय उपलब्ध असतात.

Web Title: Prime Minister Jeevan Jyoti Insurance Scheme for the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.