ससवड : दोन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सुी घेऊन आलेल्या आणि नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी मुलांना गुलाबपुष्प, गणवेश, पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून आणि दुपारी मुलांना गोड आहार तसेच शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. वनपुरी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शाळेच्या पहिल्याच दिवशी पुरंदरच्या सभापती गौरी कुंजीर यांनी अचानक भेट देऊन मुलांचे स्वागत केले. तसेच मुलांना गुलाबपुष्प, शालेय पुस्तके आणि गणवेश देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच संजय कुंभारकर, माजी उपसरपंच तुकाराम महामुनी, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी महामुनी, शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता खेडेकर, उपशिक्षिका संगीता कुदळे, संतोष काळे, दिलीप काळे आदी उपस्थित होते. या वेळी माजी सरपंच संजय कुंभारकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापिका स्मिता खेडेकर यांनी केले तर संभाजी महामुनी यांनी आभार मानले. फोटो ओळ : वनपुरी येथील प्राथमिक शाळेत सभापती गौरी कुंजीर यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत केले. या वेळी मुख्याध्यापिका स्मिता खेडेकर, संगीता कुदळे आणि इतर पालक उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात प्राथमिक शाळा उत्साहात सुरू
सासवड : दोन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सुी घेऊन आलेल्या आणि नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी मुलांना गुलाबपुष्प, गणवेश, पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून आणि दुपारी मुलांना गोड आहार तसेच शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले.
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30