नवी दिल्ली : डाळींचे भाव गुरुवारी २०० रुपयांच्या जवळ पोहोचले. वाढत्या किमती पाहून डाळी सामान्य जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे, १२० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देण्यासाठी बफर स्टॉक पाच पटीने वाढवून ८ लाख टन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सवलतीच्या दरात डाळी उपलब्ध करून देण्यास अनेक राज्यांनी आतापर्यंत डाळींचा साठा उचलण्यास रस दाखविलेला नाही. त्यामुळे केवळ बफर स्टॉक करून व त्यासाठी जास्तीत जास्त डाळी खरेदी केल्याने भाव नियंत्रणात राहतील काय? हे पाहावे लागणार आहे. डाळींचे कडाडते भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि जनतेला मागणीप्रमाणे डाळ उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत बफर स्टॉक १.५ लाख टनावरून ८ लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. बफर स्टॉकसाठी आतापर्यंत १.५ लाख टन डाळींची खरेदी करण्यात आली आहे. हीच डाळ सवलतीच्या दरात ग्राहकांना वितरित करण्यासाठी राज्यांना देण्यात येत आहे. दर स्थिरीकरण निधीतून थेट शेतकऱ्यांकडून बाजारभावात बफर स्टॉकसाठी डाळींची खरेदी करण्यात येत आहे.
याच डाळी १२० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांना देण्यासाठी राज्यांना वितरित केल्या जात आहेत. राज्यांनी बफर स्टॉकमधून प्रक्रिया न केलेली डाळ ६६ रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करावी आणि ती ठोक बाजारात १२० रुपये प्रतिकिलो दराने विकावी, यासाठी केंद्र राज्यांवर दडपण आणत आहे. मात्र, बहुतेक राज्यांनी डाळी घेण्यात रस दाखविलेला नाही.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
डाळींचे भाव २०० रुपयांच्या जवळ
डाळींचे भाव गुरुवारी २०० रुपयांच्या जवळ पोहोचले. वाढत्या किमती पाहून डाळी सामान्य जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे, १२० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देण्यासाठी बफर
By admin | Updated: June 17, 2016 03:33 IST2016-06-17T03:33:10+5:302016-06-17T03:33:10+5:30
डाळींचे भाव गुरुवारी २०० रुपयांच्या जवळ पोहोचले. वाढत्या किमती पाहून डाळी सामान्य जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे, १२० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देण्यासाठी बफर
