Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रज्ञा - पुरंदरमध्ये ६५ ग्रामपंचायतींसाठी होणार २२ एप्रिलला मतदान

प्रज्ञा - पुरंदरमध्ये ६५ ग्रामपंचायतींसाठी होणार २२ एप्रिलला मतदान

नारायणपूर : मे ते ऑगस्ट/ सप्टेंबरदरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा अचानक जाहीर झाल्याने गावोगावच्या गाव पुढार्‍यांची चांगलीच धावपळ झाली आहे. जुलैअखेर ग्रामपंचायतीच्या तारखा जाहीर अपेक्षित होते. मात्र, अचानक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने दिवसभर धावपळ पाहावयास मिळाली.

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:04+5:302015-03-25T21:10:04+5:30

नारायणपूर : मे ते ऑगस्ट/ सप्टेंबरदरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा अचानक जाहीर झाल्याने गावोगावच्या गाव पुढार्‍यांची चांगलीच धावपळ झाली आहे. जुलैअखेर ग्रामपंचायतीच्या तारखा जाहीर अपेक्षित होते. मात्र, अचानक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने दिवसभर धावपळ पाहावयास मिळाली.

Pragya - Polling for 65 Gram Panchayats in Purandar will be held on April 22 | प्रज्ञा - पुरंदरमध्ये ६५ ग्रामपंचायतींसाठी होणार २२ एप्रिलला मतदान

प्रज्ञा - पुरंदरमध्ये ६५ ग्रामपंचायतींसाठी होणार २२ एप्रिलला मतदान

रायणपूर : मे ते ऑगस्ट/ सप्टेंबरदरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा अचानक जाहीर झाल्याने गावोगावच्या गाव पुढार्‍यांची चांगलीच धावपळ झाली आहे. जुलैअखेर ग्रामपंचायतीच्या तारखा जाहीर अपेक्षित होते. मात्र, अचानक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने दिवसभर धावपळ पाहावयास मिळाली.
३० मार्चला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. ३१ मार्च (मंगळवार) ते ७ एप्रिल (मंगळवार) सकाळी अकारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. (२, ३ व ५ एप्रिल हे सार्वजनिक सु˜ीचे दिवस वगळून) दि. ८ एप्रिल रोजी सदर अर्जाची छाननी होणार आहे. १० एप्रिल रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांना निवडणुकीचे चिन्हवाटप होणार आहे. २२ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ एप्रिल रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील २२ एप्रिलला मतदान होणारी गावे पुढील प्रमाणे : सोमुर्डी, थापेवाडी / वारवडी, गराडे, देवडी, केतकावळे, नारायणपूर- पोखर, भिवडी, सुपे खुर्द, कोडीत बु., कोडीत खु., पानवडी, पांडेश्वर, जवळार्जुन, राख, दौंडज, पिंगोरी, नाझरे सुपे, कोळविहिरे, मावडी क.प., धालेवाडी, पारगाव, मावडी सुपे, पिसर्वे, साकुर्डे, शिवरी, तक्रारवाडी, बेलसर, निळुंज, वाळुंज, कुंभारवळण, खानवडी, खळद, परिंचे, सटलवाडी, लपतळवाडी, हरगुडे, हरणी, काळदरी, तोंडल, माहूर, मांढर, पोंढे, टेकवडी, राजेवाडी, पिसे, रिसे, आंबळे, वाघापूर, गुरोळी, नायगाव, चांबळी, हिवरे, दिवे, झेंडेवाडी, आंबोडी, बोपगाव, सोनोरी, मांडकी, पिसुर्टी, जेऊर, नीरा शिवतक्रार, पिंपरे खुर्द, भिवरी, आस्कारवाडी या गावांच्या निवडणुका होणार आहेत.

Web Title: Pragya - Polling for 65 Gram Panchayats in Purandar will be held on April 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.