Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रज्ञा - नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिला चोर अटकेत

प्रज्ञा - नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिला चोर अटकेत

नारायणगाव : येथील एसटी बस स्थानकात ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे २८ हजार रुपये किमतीचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणार्‍या एका महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ ही घटना आज (दि़ १४) दुपारी २.३० वाजता घडली़

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30

नारायणगाव : येथील एसटी बस स्थानकात ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे २८ हजार रुपये किमतीचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणार्‍या एका महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ ही घटना आज (दि़ १४) दुपारी २.३० वाजता घडली़

Pradnya - A woman thief halted due to citizen's alertness | प्रज्ञा - नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिला चोर अटकेत

प्रज्ञा - नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिला चोर अटकेत

रायणगाव : येथील एसटी बस स्थानकात ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे २८ हजार रुपये किमतीचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणार्‍या एका महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ ही घटना आज (दि़ १४) दुपारी २.३० वाजता घडली़
अंजना देवराम जुंदरे (वय ६५, रा़ सावरगाव, ता. जुन्नर) ही वृद्ध महिला नारायणगाव-जुन्नर एसटीने जुन्नरकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना पाठीमागील महिलेने अचानक त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढले. ते घेऊन पळून जात असताना जुंदरे यांनी आरडाओरडा केल्याने तेथील नागरिकांनी पळून जाणार्‍या महिलेला पकडले. या महिलेकडे तीन महिन्यांचे मूल होते़. तिला जुंदरे व नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले़. नारायणगाव पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिचे नाव शिल्पा रोहित सौदागर (रा़ बेलापूर, ता़ श्रीरामपूर, जि़ अहमदनगर) असे आहे. या महिलेसोबत आणखी दोन महिला होत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ या घटनेनंतर त्या फरार झाल्या़ या संदर्भात अंजना जुंदरे यांनी शिल्पा रोहित सौदागर हिच्याविरुद्घ फिर्याद दिली आहे़ पोलीस हवालदार सुदाम हरगुडे पुढील तपास करीत आहेत़
०००

Web Title: Pradnya - A woman thief halted due to citizen's alertness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.