संट्रल डेस्क/धुळे,नंदुरबारसाठीचंद्रकांत जाधव/ जळगाव- वीज बिल, प्रकल्पासाठीची जमीन आणि व्याजासंबंधी राज्यात अनुकूल वस्त्रोद्योग धोरण नसल्याने १२५ पैकी फक्त ५५ सूतगिरण्या सुरू आहेत. दुसर्या बाजूला राज्य शासन किंवा सहकारमंत्री यांनी जिल्ातील मुक्ताईनगरात झालेल्या कार्यक्रमात आपल्याकडे पिकणार्या कापसावर पूर्ण प्रक्रिया होऊन त्याचे मूल्यवर्धन करायचे असेल तर २५० सूतगिरण्यांची गरज आहे, असे म्हटले आहे. एकीकडे सूतगिरण्यांची गरज असल्याचे म्हणायचे व दुसरीकडे सूतगिरण्यांसंबंधी आखडता हात घ्यायचा..., अशी स्थिती शासनाची आहे. १२५ गिरण्यांची नोंदणीराज्यात १२५ सूतगिरण्यांची नोंदणी झाली आहे. पैकी ५५ सुरू आहेत. तर २१ गिरण्या अंशत: (पार्टली) सुरू आहेत. म्हणजेच ४९ सूतगिरण्या बंद आहेत. ५५ सूतगिरण्यांमध्ये १४ लाख १९ हजार चात्या असून, एका गिरणीस प्रतिवर्ष ४० हजार गाठींची गरज असते. म्हणजेच या ५५ गिरण्यांमध्ये १५०० लाख किलो सूताची निर्मिती वर्षाला होत असून, २५०० कोटींची उलाढाल होते. ५८ लाख गाठी पडतातराज्यात ८० लाख गाठींचे उत्पादन होते. पण फक्त ५५ गिरण्यांमध्ये सूत तयार होत असल्याने ५८ लाख गाठी शिल्लक राहतात. यामुळे शेतकर्यांना मूल्यवर्धनाचा लाभ अधिकचा होत नसल्याचे स्पष्ट होत नाही. कापसाचे भाव पडतात. सर्व १२५ सूतगिरण्या सुरू झाल्या तर ५५ लाख चात्या कार्यरत होतील. पण राज्यात वर्षागणिक वाढणारी कापूस लागवड लक्षात घेता किमान २०० सूतगिरण्यांची गरज आहे. यंत्रमागही जुनाटयंत्रमागही जुने झाले आहेत. राज्यात भिवंडी, इचलकरंजी, मालेगाव आदी ठिकाणी नऊ लाख २५ हजार यंत्रमाग आहेत. ते जुने असल्याने अडचणी येतात. खान्देशात अनेक गिरण्यांना टाळे खान्देशात लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद होळ ता.शहादा, प्रियदर्शिनी सूतगिरणी, शिरपूर, जवाहर सूतगिरणी, धुळे या सूतगिरण्या सुरू आहेत. तर अलीकडेच आदिशक्तीमुक्ताई सूतगिरणी, मुक्ताईनगर सुरू झाली आहे. जळगाव जिल्ातील यावल, खडका, नगरदेवळा या सूतगिरण्या बंद आहेत. तसेच राष्ट्रीय टेक्सटाईल कॉर्पोरेशनची (एनटीसी) धुळे येथील सूतगिरणीही बंद पडली आहे. -कोटवीज बिल व व्याजात गुजरात, मध्य प्रदेशातील वस्त्रोद्योग धोरणासारखी सूट हवी आहे. नोंदणी झालेल्या बंदावस्थेतील गिरण्या भागभांडवल गोळा करून प्रथम सुरू करण्याचे शासनाचे धोरण असल्याने नवीन सूतगिरण्या सुरू होऊ शकत नाहीत. -दीपकभाई पाटील, चेअरमन, जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद होळ शहादा
नकारात्मक धोरणांचा सूतगिण्यांना फटका वीज बिल, व्याजाबाबत हवे अनुकूल धोरण : फक्त १२५ पैकी ५५ गिरण्या पूर्ण क्षमतेने कार्यरत
सेंट्रल डेस्क/धुळे,नंदुरबारसाठी
By admin | Updated: January 3, 2016 00:03 IST2016-01-03T00:03:51+5:302016-01-03T00:03:51+5:30
सेंट्रल डेस्क/धुळे,नंदुरबारसाठी
