अकोला : बाजारपेठेत नवीन बटाटा दाखल झाला असून बटाट्याचे दर कमालीचे घसरले आहेत. दरम्यान, गेल्या २0 दिवसांमध्ये शेतमालाचे दर दुपटीने कमी झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये आणखी घटण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली .
नवीन बटाटा बाजारात दाखल होण्यापूर्वी बटाट्याच्या दराने गृहिणींचे बजेट बिघडविले होते. २५ ते ३0 रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या बटाट्यांचे दर सध्या ठोक बाजारपेठेत ५ ते ५.५0 रुपयांवर आले आहेत. अकोला येथील बाजारपेठेत रविवारी बटाटे ५२0 रुपये क्विंटलने विकला गेला. २0 मार्चपर्यंत बटाट्यांचे दर ११00 रुपये होते. २५ मार्चनंतर उत्तर प्रदेशातील नवीन बटाटा बाजारपेठेत पोहोचताच दर पडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ८00 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गेलेल्या बटाट्यांना आता क्विंटलमागे ५२0 रुपये दर मिळत आहेत. किरकोळ बाजारात हेच बटाटे ६ ते ७ रुपये किलो विकले जात आहेत. गत २0 दिवसांमध्ये बटाट्यांचे दर दुपटीने खाली आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
बटाट्याचे दर गत काही दिवसांत झपाट्याने पडले आहेत. शेतकऱ्यांकडील माल बाजारपेठेत येताच दर पडण्याचे प्रकार सुरू होऊन त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. दर वाढले की सर्वांची ओरड सुरू होते. सध्या बटाट्याच्या दरामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, असे अकोला येथील व्यावसायिक वसंत बाछुका यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बटाट्याचे भाव घसरले; अधिक उत्पादनाचा फटका
बाजारपेठेत नवीन बटाटा दाखल झाला असून बटाट्याचे दर कमालीचे घसरले आहेत. दरम्यान, गेल्या २0 दिवसांमध्ये शेतमालाचे
By admin | Updated: April 7, 2015 23:15 IST2015-04-07T23:15:56+5:302015-04-07T23:15:56+5:30
बाजारपेठेत नवीन बटाटा दाखल झाला असून बटाट्याचे दर कमालीचे घसरले आहेत. दरम्यान, गेल्या २0 दिवसांमध्ये शेतमालाचे
