‘ती’ राजपोस्ट गावगिरीहरमल- र्शीनिवास दाभोलकर गोव्यातील पंचायत निवडणुकीच्या अवघ्याच काही दिवसांनंतर पंचायत संचालनालयाने महिला पंचायत सदस्याच्या पती राजाना पंचायत बैठकीत बसण्याचा वा हस्तक्षेप न करण्यासाठी आदेश जारी केला होता. निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले होते व कालांतराने त्याची अंमलबजावणी होऊ लागली. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे अलीकडे पती राज ग्रामसभांत बोलताना आढळतात. ग्रामसभेत बोलण्याचा प्रत्येकास हक्क आहे. तसेच आक्षेप घेण्याचासुद्धा तितकाच अधिकार आहे. पंच सदस्यांचे पती म्हणून ऐकून घेण्यासाठी विषयाचे गांभीर्य व सत्यता पाहावी लागते; परंतु एखाद्या जाणकाराप्रमाणे विषय मांडावा, जो पंचाने मांडणे उचित असते; परंतु इथे पती विषय मांडतो व हसे करून घेतो. त्यामुळे पंचाचासुद्धा अपमान होतो, हे बिचार्याला समजत नाही. महिला शिक्षित असल्यास बरे त्या पुरुषांच्या बरोबर पंचायत क्षेत्रात वावरण्यास सक्षम नसतात, पंचायत कायदा, ग्रामसभा, प्रश्न मांडणे, सूचना देणे आदींबाबत तितके सखोल ज्ञान आत्मसात करावे लागते. पंच सदस्यांना कार्यशाळा उपयोगी असली तरी पती राजामुळे ती शक्य होत नसते. मुळात महिला पंचाच्या वतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न पती राजाने खरेच करावा काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. स्वत:ची सीमा माहीत असताना असे उपद्व्याप तोंडघशी पडण्यास पुरेसे असतात. तेव्हा पंचांना कार्यशाळा घेताना महिलांना अधिकार, महिलांना आरक्षण आदींविषयी चुकीचा समज लोकमानसात रूढ होत आहे. त्यांच्या नावाखाली कित्येक पती राज, राजा बनलेले आहेत; परंतु जेथे शिक्षित, सुशिक्षित पिढी ग्रामसभांत ठसा उमटवत आहेत, त्याठिकाणी पती राज ठरू शकते, राजा ठरू शकत नाही, हे सत्य होय.
पोस्ट गावगीरी - ‘पती’ राज
‘पती’ राज
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:23+5:302014-08-27T21:30:23+5:30
‘पती’ राज
