नवी दिल्ली : टपाल खात्याला प्रत्येक पोस्ट कार्डमागे सात आणि अंतर्देशीय पत्रामागे पाच रुपयांचे नुकसान होत आहे. कारण त्यापासून खात्याला मिळणारे उत्पन्न मूळ गुंतवणुकीपेक्षा कमी आहे.
टपाल विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे २०१३-२०१४ च्या आकडेवारीनुसार पोस्टकार्डचा सरासरी खर्च ७५३.३७ पैसे व उत्पन्न ५० पैसे, तर अंतर्देशीय पत्राचा खर्च ७४८.३९ पैसे, तर उत्पन्न २५० पैसे आहे. स्पर्धा पोस्टकार्ड, पत्र आणि पत्र-पत्रिकांचे बुकपोस्ट वगळता टपाल खात्याच्या बहुतेक सेवा या तोट्यात चालणाऱ्या आहेत. पार्सल, रजिस्ट्री, स्पीड पोस्ट, विमा, मनिआॅर्डर, इंडियन पोस्टल आॅर्डर आणि नोंदणीकृत वृत्तपत्र आदी सेवांचे उत्पन्न हे त्यातील गुंतवणुकीपेक्षा कमी आहे.
टपाल खात्याचा वार्षिक तोटा आर्थिक वर्ष २०१३-२०१४ दरम्यान ०.८७ टक्के वाढून ५,४७३.१ कोटी रुपये झाला. तो गेल्या आर्थिक वर्षात ५,४२५.८८ कोटी रुपये होता.
लोकांना टपाल सेवा स्वस्तात मिळावी यासाठी सरकार कमी खर्चात पोस्ट कार्ड व इतर टपाल साहित्य पुरविते. सर्व टपाल साहित्याच्या तुलनेत पोस्ट कार्ड सर्वाधिक वापरले जाते.
५० पैशांचे पोस्ट कार्ड तयार होते साडेसात रुपयांत
टपाल खात्याला प्रत्येक पोस्ट कार्डमागे सात आणि अंतर्देशीय पत्रामागे पाच रुपयांचे नुकसान होत आहे. कारण त्यापासून खात्याला मिळणारे उत्पन्न मूळ गुंतवणुकीपेक्षा कमी आहे.
By admin | Updated: April 6, 2015 02:48 IST2015-04-06T02:48:58+5:302015-04-06T02:48:58+5:30
टपाल खात्याला प्रत्येक पोस्ट कार्डमागे सात आणि अंतर्देशीय पत्रामागे पाच रुपयांचे नुकसान होत आहे. कारण त्यापासून खात्याला मिळणारे उत्पन्न मूळ गुंतवणुकीपेक्षा कमी आहे.
