नवी दिल्ली : युरोपियन युनियन भारतीय आंबा व अन्य भाजीपाल्यांवरील आयातबंदी चालू महिन्यात मागे घेण्याची शक्यता आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गेल्या एप्रिलमध्ये २८ सदस्य देश असलेल्या युरोपियन महासंघाने एक मेपासून भारतातून हापूस आंबा व चार अन्य भाज्यांची आयात करण्यास बंदी घातली होती.
भारतीय निर्यात निरीक्षण परिषदेचे संचालक एस.के. सक्सेना यांनी सांगितले की, अलीकडेच युरोपीय महासंघाचे अन्न व पशुपालन कार्यालयाच्या पथकाने आमच्या वेष्ठण केंद्र व अन्य संस्थांची तपासणी केली. पथकाने लवकरच आंबा व अन्य भाज्यांच्या आयातीवरील बंदी उठविण्याचा विश्वास व्यक्त केला. येथे सीआयआयने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा व गुणवत्ता परिषदेत बोलत होते. यासंदर्भात अपेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला की, युरोपीय महासंघाच्या पथकाने भारत दौरा केला. बंदीसंदर्भात राष्ट्रीय वृक्षसुरक्षा प्राधिकरण आणि अपेडाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चाही केली आणि ही चर्चा सकारात्मक राहिली. अपेडाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘युरोपियन युनियनचे पथक आमच्या संस्थेबाबत समाधानी आहे आणि त्यांनी एक अहवालही सोपविला असून याबाबत सदस्य देश विचार-विनिमय करीत आहेत.’
याआधी वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारमण यांनीही युरोपियन युनियन बंदी उठविण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले होते. युरोपियन युनियनच्या या पथकाने फळ-पालेभाज्यांची प्रमाणीकरण प्रणाली व कारखान्यांची स्थिती नियंत्रणात आवश्यक त्या सुधारणांसाठी तपासणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारतीय आंब्यावरील बंदी युरोपियन युनियन मागे घेण्याची शक्यता
युरोपियन युनियन भारतीय आंबा व अन्य भाजीपाल्यांवरील आयातबंदी चालू महिन्यात मागे घेण्याची शक्यता आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली
By admin | Updated: December 3, 2014 00:33 IST2014-12-03T00:33:44+5:302014-12-03T00:33:44+5:30
युरोपियन युनियन भारतीय आंबा व अन्य भाजीपाल्यांवरील आयातबंदी चालू महिन्यात मागे घेण्याची शक्यता आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली
