चेन्नई : बाजारात लवकरच नव्या एअर एशिया या विमान कंपनीचे विमान उड्डाण घेणार आहे. १२ जूनपासून श्रीगणेशा होणार्या या विमानाचा पहिला प्रवास बंगळुरू ते गोवा या हवाईमार्गावर होईल. या प्रवासाकरिता कंपनीने केवळ ९९० रुपये प्रति प्रवासी भाडे आकारले. यात सर्व करांचाही समावेश आहे. विमानाच्या सर्वात स्वस्त दरामुळे इतर विमान कंपन्यांच्या भाड्यातही स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अन्य विमानसेवा पुरविणार्या कंपन्यांनादेखील आपल्या भाड्यात संशोधन करावे लागणार आहे, हे नक्की. कदाचित यामुळे विमान प्रवास हा सर्वसामान्यांच्या आवाक्यातही येईल. स्वस्त भाडे आकारणार्या एअर एशिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य म्हणाले की, शुक्रवारपासून कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरू होणार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापूर्वी शांडिल्य म्हणाले होते की, विमान प्रवासाचे भाडे सध्याच्या बाजारातील दराच्या तुलनेत ३५ टक्क्यांपर्यंत कमी राहील. शांडिल्य म्हणाले की, १२ जून रोजी ए ३२० हे विमान पहिली उड्डाण घेणार आहे. बंगळुरूहून तीन वाजता अपराह्नकडे, त्यानंतर गोवाकडे परतीच्या प्रवासाला विमान निघेल. दिल्ली आणि मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा कंपनीचा तूर्तास विचार नाही. या विमान कंपनीत एअरएशिया इंडिया, एअर एशिया, टाटा सन्स आणि अरुण भाटियांच्या टेलेस्ट्रा ट्रेडप्लेस यांची संयुक्त भागीदारी आहे. विमानसेवा सुरू करण्याकरिता तब्बल नऊ महिन्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. विविध कायद्यांच्या अडचणींना सामोरे गेल्यानंतर विमान नियामक डीजीसीएने विमानाच्या उड्डाणाला अखेरीस मंजुरी दिली. नवी विमान कंपनी बाजारात उतरण्याच्या पार्श्वभूमीवर स्पाईसजेट आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांना आपले दर कमी करावे लागले होते. शांडिल्य पुढे म्हणाले की, पहिल्या उड्डाणाबद्दल आम्ही अत्यंत उत्साही आहोत. १०० टक्के सीट भरण्याची आम्हाला अपेक्षा आहे; परंतु ६० टक्के सीट मिळाले. तरीही समाधानकारक बाब राहील. भाडे कमी आकारल्याने बाजारातील कंपन्यांना त्यांचा खर्च कमी करण्यास मदत होईल. चालू वर्षाअखेरीस देशभरात १० विमानांसह १० शहरांत विमानसेवा पुरविण्याचा मानसही शांडिल्य यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले की, कंपनीने आपल्या कर्मचार्यांवर मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या कंपनीत ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. गुंतवणुकीचा पूर्ण खर्च चार महिन्यांत वसूल होईल, असा विश्वासही शांडिल्य यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
विमान कंपन्यांत दर युद्ध भडकण्याची शक्यता
बाजारात लवकरच नव्या एअर एशिया या विमान कंपनीचे विमान उड्डाण घेणार आहे. १२ जूनपासून श्रीगणेशा होणार्या या विमानाचा पहिला प्रवास बंगळुरू ते गोवा या हवाईमार्गावर होईल
By admin | Updated: May 31, 2014 06:32 IST2014-05-31T06:32:10+5:302014-05-31T06:32:10+5:30
बाजारात लवकरच नव्या एअर एशिया या विमान कंपनीचे विमान उड्डाण घेणार आहे. १२ जूनपासून श्रीगणेशा होणार्या या विमानाचा पहिला प्रवास बंगळुरू ते गोवा या हवाईमार्गावर होईल
