Lokmat Money > बिझनेस न्यूज > 500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता

500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता

ग्राहकांसाठी नवी खुशखबर घेऊन रिलायन्स जीओ येण्याची शक्यता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 11:30 IST2017-07-05T11:10:57+5:302017-07-05T11:30:30+5:30

ग्राहकांसाठी नवी खुशखबर घेऊन रिलायन्स जीओ येण्याची शक्यता आहे.

The possibility of reaching the Rs | 500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता

500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5- रिलायन्स जिओने फ्री इंटरनेट आणि कॉलिंग सेवा देऊन आधीच करोडो ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं आहे. आता पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवी खुशखबर घेऊन रिलायन्स जीओ येण्याची शक्यता आहे. सर्वात कमी किंमतीचा 4G VoLTE सेवा देणारा मोबाइल फोन लाँच करण्याच्या तयारीत रिलायन्स जिओ असल्याची माहिती मिळते आहे. ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने या मोबाइलची किंमत 500 रूपये असेल असा अंदाज वर्तविला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 21 जुलै रोजी होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेत या मोबाइल फोनची घोषणा होण्याची शक्यता आहे. द इकोनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे. 
 
या नव्या मोबाइल फोनच्या घोषणेआधी जिओकडून नवा प्लॅन ग्राहकांसाठी आणला जाणार आहे, असं या संदर्भातील माहिती असणाऱ्यांनी सांगितलं आहे. जिओने सुरू केलेली 84 दिवसांची धन- धना- धन ऑफर आता लवकरच संपणार आहे. त्याआधी नवी ऑफर ग्राहकांसाठी आणली जाइल. 84 दिवसांची ही ऑफर 11 एप्रिल रोजी बाजारात आली होती. 
एचएसबीसीचे डायरेक्टर आणि टेलीकॉम तज्ज्ञ राजीव शर्मा यांनी एका अहवालात म्हंटलं आहे की, 2G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना 4Gकडे वळविण्यासाठी जिओ त्यांच्या 4G फीचर फोनची किंमत 500 रूपये निश्चित करू शकतो. जिओच्या प्रत्येक हॅण्डसेटवरील 650-975 रूपयांपर्यतची किंमत कंपनी भरणार आहे, असंही अहवालात म्हंटलं आहे.
 
 
जिओकडून मिळत असलेले कमी पैशातील डेटा प्लॅन्स आणि नव्याने येणारा 4G VoLTE  फीचर फोनमुळे जिओच्या सध्या असलेल्या सबस्क्रायबर्समध्ये आणखीन वाढ करण्याचा रिलायन्स प्रयत्न करेल, अशी आशा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 
4G VoLTE सेवा देणारी जीओ ही एकमेव कंपनी आहे. जीओच्या प्रतिस्पर्धी असलेल्या एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या कंपन्या अजून VoLTE सेवा देण्यासाठी ट्रायर करत आहेत. व्यावसायिक स्वरूपात त्यांनी अजूनही काम सुरू केलेलं नाही.
 
"आम्हाला हॅण्डसेट किंमतीच्या कोणत्याही स्पर्धेत पडायचं नाही. याचा आमच्या वर किती परिणार होइल हे बघायचं आहे, असं जिओच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं आहे. जिओने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करून धुमाकूळ घातला होता. यावरून सुरू झालेलं हे युद्ध अजून वर्षभऱ चालू शकतं, असंही त्या कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.  

 

Web Title: The possibility of reaching the Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.