सिंगापूर : खनिज तेल उत्पादक देशांकडून (ओपेक) परस्परविरोधी वक्तव्ये केली जात असली तरी या महिन्यात होणाऱ्या तेल उत्पादक देशांच्या बैठकीत उत्पादन गोठविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य प्रमुख तेल उत्पादक देश कुवैतने केले आहे. त्यामुळे बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाली.
कुवैतचे ओपेक गव्हर्नर नवल अल-फेझाइया यांनी सांगितले की, बड्या तेल उत्पादक देशांसमोर उत्पादन गोठविण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. दरम्यान, खनिज तेलाच्या किमतींतील वाढीबाबत या क्षेत्रातील जाणकारांनी मात्र निराशा व्यक्त केली आहे.
प्रचंड पुरवठा आणि आर्थिक मंदीमुळे कमजोर मागणी अशी सध्याची स्थिती असल्यामुळे किमतींतील वाढ तग धरू शकणार नाही, असे जाणकारांनी
सांगितले.
जागतिक बाजारात अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे मे महिन्यातील डिलिव्हरीसाठीचे भाव ९७ सेंटांनी अथवा २.७0 टक्क्यांनी वाढले. या वाढीनंतर भाव ३६.८६ डॉलरवर गेले. ब्रेंट क्रूड तेलाचे भाव जूनच्या डिलिव्हरीसाठी ६८ सेंटांनी अथवा १.८0 टक्क्यांनी वाढले. त्याबरोबर ब्रेंट क्रूड तेल ३८.५५ डॉलर प्रति बॅरल झाले. (वृत्तसंस्था)
उत्पादन कपातीच्या शक्यतेने तेल तेजीत
खनिज तेल उत्पादक देशांकडून (ओपेक) परस्परविरोधी वक्तव्ये केली जात असली तरी या महिन्यात होणाऱ्या तेल उत्पादक देशांच्या बैठकीत उत्पादन गोठविण्याचा निर्णय घेतला जाईल
By admin | Updated: April 6, 2016 22:54 IST2016-04-06T22:54:01+5:302016-04-06T22:54:01+5:30
खनिज तेल उत्पादक देशांकडून (ओपेक) परस्परविरोधी वक्तव्ये केली जात असली तरी या महिन्यात होणाऱ्या तेल उत्पादक देशांच्या बैठकीत उत्पादन गोठविण्याचा निर्णय घेतला जाईल
