मुंबई : सोन्यावरील सीमा शुल्क कमी न करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सोन्याची तस्करी वाढू शकते, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय रत्न आणि आभूषण महासंघाने दिला आहे.
सध्या सोन्यावर १० टक्के सीमा शुल्क आकारले जाते. हे शुल्क कमी न करण्याच्या निर्णयाचा फटका दागदागिने उद्योगाला बसू शकतो. विशेष म्हणजे सोन्याची तस्करी वाढू शकते. शिवाय या उद्योगासाठी कच्चा मालही उपलब्ध होणार नाही, असे सांगत अखिल भारतीय रत्न आणि आभूषण महासंघाचे अध्यक्ष हरीश सोनी यांनी रत्न आणि आभूषण उद्योगावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. भारतीय बाजारात सोन्यावरील प्रीमियम ६ ते १० डॉलर प्रति औंस आहे. सीमा शुल्क कमी न करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे यात वाढ होऊ शकते. काळाबाजार वाढल्याने सरकारचा महसूलही बुडेल, असे सोनी यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता
सोन्यावरील सीमा शुल्क कमी न करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सोन्याची तस्करी वाढू शकते, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय रत्न आणि आभूषण महासंघाने दिला आहे.
By admin | Updated: July 28, 2014 03:09 IST2014-07-28T03:00:02+5:302014-07-28T03:09:49+5:30
सोन्यावरील सीमा शुल्क कमी न करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सोन्याची तस्करी वाढू शकते, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय रत्न आणि आभूषण महासंघाने दिला आहे.
