Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिवासींसाठी एफडीआयचे नियम उदार होण्याची शक्यता

अनिवासींसाठी एफडीआयचे नियम उदार होण्याची शक्यता

प्रवासी भारतीय किंवा अनिवासी भारतीयांसाठी थेट विदेशी गुंतवणुकीचे नियम उदार करण्याचा सरकार विचार करीत आहे.

By admin | Updated: February 25, 2015 04:27 IST2015-02-25T00:23:36+5:302015-02-25T04:27:16+5:30

प्रवासी भारतीय किंवा अनिवासी भारतीयांसाठी थेट विदेशी गुंतवणुकीचे नियम उदार करण्याचा सरकार विचार करीत आहे.

The possibility of generating FDI rules for non-residents | अनिवासींसाठी एफडीआयचे नियम उदार होण्याची शक्यता

अनिवासींसाठी एफडीआयचे नियम उदार होण्याची शक्यता

नवी दिल्ली : प्रवासी भारतीय किंवा अनिवासी भारतीयांसाठी थेट विदेशी गुंतवणुकीचे नियम उदार करण्याचा सरकार विचार करीत आहे. देशात विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह वाढावा असा त्यामागे विचार आहे. यासंदर्भात लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यासाठी गेल्या वर्षी सरकारने समिती स्थापन केली होती. अनिवासी भारतीयांनी भारतात पाठविलेल्या पैशाला (जो परत पाठवता येत नाही) देशांतर्गत गुंतवणुकीचा दर्जा द्यायच्या शक्यतेवर ही समिती विचार करणार होती.
अनिवासी भारतीयांकडील पैशाला दिशा मिळावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक अनिवासी भारतीय विदेशात मोठे उद्योग करीत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सरकारने संरक्षण, रेल्वे, बांधकाम, वैद्यकीय उपकरणे, विमा आदी क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीसाठीचे नियम उदार केले आहेत.

Web Title: The possibility of generating FDI rules for non-residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.