नवी दिल्ली : गरिबांसाठीच्या आरोग्य योजनांची सांगड जनधन योजनेशी घालण्याच्या दिशेने सरकार काम करीत आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
वित्तीय समावेश कार्यक्रम असलेल्या पंतप्रधान जनधन योजनेतहत १४ कोटी बँक खाते उघडण्यात आली असून, या खात्यात १४ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. पुढच्या टप्प्यात जनधन योजनेतहत गरीब घटकांना आरोग्य योजना कशी उपलब्ध करून देता येईल, या दिशेने काम केले जात आहे. जनधन योजनेतहत बँकेत खाते उघडण्यात आल्याने बँकिंग सेवा गरीब घटकांपर्यंत पोहोचली आहे. आता आम्ही बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून काही रक्कम टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे कोट्यवधी लोकांना सरकारच्या विविध योजनांच्या लाभापोटी मिळणारी रक्कम बँक खात्यातच जमा होईल. एक लाखाच्या अपघात विम्याचे संरक्षण आणि ३० हजार कोटी रुपयांच्या आयुर्विम्याशिवाय जनधन खाते पेन्शन योजनेशी जोडले जाईल, असेही जेटली म्हणाले.
‘जनधन’शी जोडणार गरिबांची आरोग्य योजना
गरिबांसाठीच्या आरोग्य योजनांची सांगड जनधन योजनेशी घालण्याच्या दिशेने सरकार काम करीत आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
By admin | Updated: April 9, 2015 00:06 IST2015-04-09T00:06:02+5:302015-04-09T00:06:02+5:30
गरिबांसाठीच्या आरोग्य योजनांची सांगड जनधन योजनेशी घालण्याच्या दिशेने सरकार काम करीत आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
