पीएमआरडीए ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:02+5:302015-06-12T17:38:02+5:30

पीएमआरडीए ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुचनापुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) मनुष्यबळाची कमरता असल्यामुळे यापुढील काळात कामांचे आऊटसोर्सिंग करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पीएमआरडीए ने कमीत कमी मनुष्यबळात काम करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी पीएमआरडीए ची स्थापना करण्यात आली. पीएमआरडीए ची स्थापना होऊन दोन महिने झाले तरी प्राधिकरणाला आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध झालेले नाही. पीएमआरडीएच्या पहिल्याच बैठकीत आवश्यक असलेल्या कमर्चा-यांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आलेला आहे. मात्र यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, पीएमआरडीए साठी आवश्यक असलेले कमर्चारी वर्ग लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. आता प्रधिकरणाने कमीत कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त काम केले पाहिजे. तसेच कामांचे आऊटसोर्सिंग करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून कामे करण्यावर भर दिला पाहिजे. १ मे रोजी पीएमआरडीए कामकाज प्रत्यक्ष स्वत:च्या कार्यालयातून होऊ लागले. कार्यालयीन कामकाजासाठी सध्या नगररचना विभागातील कर्मचा-यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. पण या कर्मचा-यांची संख्या अपुरी असल्याने कामामध्ये जास्त प्रगती होऊ शकली नाही. पीएमआरडीए च्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. दोन्ही बैठकीमध्ये आकृतिबंधावर चर्चा झाली. मात्र हा प्रस्ताव शासनाकडे अजूनही प्रलंबित असून यावर लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.