बधडी: येथील राज्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.राज्य रस्ता दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच डागडुजी करुन बनविण्यात आला. किनवट-नांदेड राज्य रस्त्यावर असलेल्या बोधडी ते चिखली रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच चिखली ते बोधडी रस्त्याची गिी टाकून डागडुजी करण्यात आली. परंतु दोन वेळेस आलेल्या पावसामुळे पूर्ण गिी निघून गेली आहे. यामुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील उघड्या गिीमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. अनेक वेळा संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे नागरिक व वाहनचालक संतप्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पाऊणतास लागत आहे. त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
बोधडीच्या राज्य रस्त्याची दयनीय अवस्था
बोधडी: येथील राज्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:24+5:302014-08-22T22:11:24+5:30
बोधडी: येथील राज्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
