मुंबई : आपल्या बौद्धिक संपदेचे हक्क गाजवून बाजारात मक्तेदारी निर्माण करू पाहणाऱ्या फायझर या बलाढ्य बहुराष्ट्रीय औषध उत्पादक कंपनीस ‘टोफासिटिनिब’ या संधिवातावरील औषधाचे पेटन्ट पुन्हा नाकारले.
चार वर्षांत पेटन्टच्या बाबतीत फायझरला बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी भारताच्या पेटन्ट नियंत्रक कार्यालयाने फायझर कंपनीस याच औषधाचे पेटन्ट देण्यास नकार दिला होता. याविरुद्ध कंपनीने अपील केल्यावर ‘इटलेक्च्युअल प्रॉपर्टी अॅपेलेट बोर्डा’ने सरकारला यावर फेरविचार करण्यास सांगितले होते.
‘टोफासिटिनिब’ या औषधात आपण स्वत: संशोधन करून तयार केलेले खास रासायनिक मिश्रण आहे व या औषधातील तोच खरा परिणामकारक घटक आहे. त्यामुळे या औषधाचे पेटन्ट आपल्याला मिळावे, असे फायझर कंपनीचे म्हणणे होते.
फायझरला संधिवाताच्या औषधाचे पेटंट नाकारले
आपल्या बौद्धिक संपदेचे हक्क गाजवून बाजारात मक्तेदारी निर्माण करू पाहणाऱ्या फायझर या बलाढ्य बहुराष्ट्रीय औषध उत्पादक कंपनीस ‘टोफासिटिनिब’ या संधिवातावरील
By admin | Updated: September 8, 2015 00:40 IST2015-09-08T00:40:50+5:302015-09-08T00:40:50+5:30