नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या अंशधारकाला स्वस्तात घर विकत घेता यावे म्हणून त्याचे भविष्यातील भविष्यनिधी योगदान तारण ठेवायला मान्यता देऊ शकते. अशा प्रस्तावावर ईपीएफओचे विश्वस्त मंडळ विचार करीत आहे. ईपीएफओचे केंद्रीय विश्वस्त मंडळ भविष्य निधी अंशधारकांना निवाऱ्याची सोय होण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालावर विचार करील.
अंशधारकांना घर विकत घेण्यासाठी योजनेची शिफारस समितीने केली आहे. त्यानुसार अंशधारक त्याच्या भविष्यनिधीतून आगाऊ रक्कम घेऊ शकेल आणि कर्जाची मासिक फेड म्हणून त्याची दरमहाचे अंशदान कर्ज देणाऱ्याकडे तारण ठेवण्यास मंजुरी असेल. या प्रस्तावित योजनेनुसार अंशदाता, बँक आणि ईपीएफओ यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार असेल.
योजनेनुसार अंशदाता बँक किंवा घर देणाऱ्या कंपनीकडून मिळालेले कर्ज आणि संपत्तीला तारण ठेवून घर विकत घेईल. लाभार्थीला निवारा आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाच्या योजनांचे लाभही मिळतील. संघटित क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी (ज्यांचा भविष्य निधी कपात होतो) ही योजना असल्याचे समितीने म्हटले आहे. पेन्शनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र आॅनलाईन पाठविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार आहे.
स्वस्त घरासाठी पीएफ तारण ठेवण्याची सोय
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या अंशधारकाला स्वस्तात घर विकत घेता यावे म्हणून त्याचे भविष्यातील भविष्यनिधी योगदान तारण ठेवायला मान्यता देऊ
By admin | Updated: September 9, 2015 03:38 IST2015-09-09T03:38:53+5:302015-09-09T03:38:53+5:30
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या अंशधारकाला स्वस्तात घर विकत घेता यावे म्हणून त्याचे भविष्यातील भविष्यनिधी योगदान तारण ठेवायला मान्यता देऊ
