Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल २ रुपयांनी तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त

पेट्रोल २ रुपयांनी तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटरमागे २ रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रतिलिटरमागे ५० पैशांची कपात करण्यात आली आहे.

By admin | Updated: August 31, 2015 19:04 IST2015-08-31T18:48:38+5:302015-08-31T19:04:52+5:30

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटरमागे २ रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रतिलिटरमागे ५० पैशांची कपात करण्यात आली आहे.

Petrol costs Rs 2 and diesel 50 paise with cheap | पेट्रोल २ रुपयांनी तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त

पेट्रोल २ रुपयांनी तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ - महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. आज (सोमवार) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी पेट्रोलच्या दरात १ रुपया २७ पैशांनी, तर डिझेलच्या दरात १ रुपया १७ पैशांनी (प्रति लिटर) कपात करण्यात आली होती. तसेच १ ऑगस्ट रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे २ रुपये ४३ पैसे व ३ रुपये ६० पैशांनी कपात करण्यात आली होती.

 

Web Title: Petrol costs Rs 2 and diesel 50 paise with cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.