Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल ७४ पैसे तर डिझेल १.३० रुपयाने स्वस्त

पेट्रोल ७४ पैसे तर डिझेल १.३० रुपयाने स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ७४ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १.३० रुपयाची कपात

By admin | Updated: April 16, 2016 04:23 IST2016-04-16T04:23:18+5:302016-04-16T04:23:18+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ७४ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १.३० रुपयाची कपात

Petrol is 74 paise and diesel is cheaper by 1.30 rupees | पेट्रोल ७४ पैसे तर डिझेल १.३० रुपयाने स्वस्त

पेट्रोल ७४ पैसे तर डिझेल १.३० रुपयाने स्वस्त

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ७४ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १.३० रुपयाची कपात जाहीर केली. हे नवे दर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लागू होतील.
पेट्रोलच्या किमतीत १ मार्चनंतर प्रथमच घट करण्यात आली आहे. याआधी ५ एप्रिलला पेट्रोलचे दर २.१९ रुपये आणि डिझेलचे दर ९८ पैशांनी वाढविण्यात आले होते. तर त्याआधी १७ मार्च रोजी पेट्रोलचे दर ३.०७ रुपयांनी वाढविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Petrol is 74 paise and diesel is cheaper by 1.30 rupees