नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ६३ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १.०६ रुपयांनी कपात करून आपल्या ग्राहकांना नववर्षाची भेट दिली आहे. ही दरकपात गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली.
या दर कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ५९.३५ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर ४५.०३ रुपये राहतील, असे इंडियन आॅईल कार्पोरेशनने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे कंपनीने स्पष्ट केले.
तेल कंपन्या १५ दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो. विमान इंधनही प्रति किलोलिटर ४४२८ रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. आता विमान इंधन ३९८९२.३२ रुपये प्रति किलोलिटर दराने मिळेल.
पेट्रोल ६३ पैसे तर डिझेल १.०६ रुपयाने स्वस्त
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ६३ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १.०६ रुपयांनी कपात करून आपल्या ग्राहकांना नववर्षाची भेट दिली आहे.
By admin | Updated: January 1, 2016 01:17 IST2016-01-01T01:17:53+5:302016-01-01T01:17:53+5:30