इलकरंजी : येथील गांधी चौकातील एका बेकरीत तीन युवक व एक युवती अश्लील चाळे करीत असल्याचे निदर्शनात आल्याने त्यातील दोघांना जमावाने बेदम मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत एक युवक व संबंधित युवतीने पलायन केले.गांधी चौकातील एका बेकरीत तीन युवक व एक युवती आइस्क्रीम खात बसले होते. ते एकमेकांशी अश्लील चाळे करीत असल्याचे रस्त्यावरील लोकांना दिसले. त्यामुळे बेकरीसमोर गर्दी जमली. हे लक्षात येताच युवक व युवती बेकरीतून बाहेर येऊ लागले. मात्र, जमावाने त्यांना अडवून जाब विचारला. त्यांची महाविद्यालयातील ओळखपत्रे दाखविण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील असल्याचे सांगितले.दरम्यान, संतप्त जमावातील काहींनी दोघांना पकडून मारण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. याचा फायदा घेत तिसरा युवक व ती युवती पळून गेली. इकडे जमावाने त्या दोघांना बेदम मारहाण केली. काही वेळाने तीन पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांना घेऊन गेले. या घटनेची उशीरपर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.
अश्लील वर्तन करणार्या दोघांना जमावाचा चोप
इचलकरंजी : येथील गांधी चौकातील एका बेकरीत तीन युवक व एक युवती अश्लील चाळे करीत असल्याचे निदर्शनात आल्याने त्यातील दोघांना जमावाने बेदम मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत एक युवक व संबंधित युवतीने पलायन केले.
By admin | Updated: September 20, 2014 22:19 IST2014-09-20T22:19:35+5:302014-09-20T22:19:35+5:30